Sahakar Mitra NCDC

Good News सुशिक्षित बेरोजगारांसाठी केंद्र सरकारची महत्वाची नवीन योजना | Sahakar Mitra NCDC

Sahakar Mitra NCDC: नमस्कार मित्रांनो, आज आपण सहकार मित्र internship योजना 2022 या योजनेविषयी माहिती या लेखात पाहणार आहोत. केंद्रसरकारची हि योजना देशातील बेरोजगार तरुणांसाठी खूप लाभदायी ठरली आहे. यामध्ये आपण इंटर्नशिप योजना काय आहे, त्याचे लाभ, उद्दिष्ट्य ,पात्रता, अटी, अर्ज कुठे व कसा करायचा, इंटर्नशिप चा कालावधी किती, इंटर्नशिप दरम्यान मिळणारी रक्कम किती या सर्व घटकांची माहिती आज आपण या लेखात पाहणार पाहतो. जर तुम्हीही सुशिक्षित बेरोजगार असाल, तर तुम्ही हा लेख संपूर्णपणे नक्की वाचाआणि या योजनेचा अवश्य लाभ घ्या.


Digital India Internship Scheme 2022

नोकरीपूर्वी कोणत्याही कंपनीत इंटर्नशिप किंवा प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून इंटर्नशिप (internship) दरम्यान त्या व्यक्तीला प्रशिक्षण दिले जाते. या इंटर्नशिप किंवा प्रशिक्षण कालावधीत व्यक्तीला पैसे कमविण्याच्या संधी मिळाव्यात या उद्देशाने कृषी व कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या सहकार्याने केंद्र सरकारने सहकार मित्र योजना 2022 सुरू केली आहे. कारण कंपनी इंटर्नशिप दरम्यान मासिक वेतन देऊ करत नाहीत. या मुले गरीब बेरोजगारांना इंटर्नशिप दरम्यान आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. या सर्व गोष्टींचा विचार करता राष्ट्रीय सहकार महामंडळाने (एनसीडीसी) सदर योजना सुरू केली आहे. ज्या तरुणांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना किमान ४ महिने मासिक पेमेंटसह इंटर्नशिपसाठी ठेवले जाईल.

सहकार मित्र योजना 2022 चे उद्दिष्ट्य | Objective of Sahakar Mitra Yojana 2022

देशातील तरुण पिढीला योग्य दिशेने जाण्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळामार्फत कृषी व कल्याण मंत्रालयामार्फत सहकार मित्र योजना 2022 सुरू केली गेली आहे. सध्याच्या काळात कोणतीही कंपनी नोकरी देण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीला इंटर्नशिप किंवा प्रशिक्षण घेते गरजेचे असते. त्या बदल्यात त्यांना कोणत्याही प्रकारचे वेतन दिले जात नाही. कालावधीत गरीब आणि गरजू विध्यार्थ्यांना आर्थिक ताण सोसावा लागतो. या गोष्टीचा विचार करून सहकार मित्र योजना २०२१ केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत इंटर्नशिपबरोबर त्या व्यक्तीला पगारही देण्यात येईल. या योजनेच्या मदतीने तरुणांना त्यांच्या कौशल्यांबरोबरच पैसेही मिळू शकतील. कोणताही इच्छुक तरुण सहकार मित्र योजनेत अर्ज करू शकतात.

आपल्या देशात कुशल लोकांची कमतरता आहे, ज्यामुळे बेरोजगारांना लवकर रोजगार मिळू शकत नाही. जर या लोकांना प्रशिक्षण तसेच कमाईच्या संधी उपलब्ध करुन दिल्या गेल्या तर युवकांची कौशल्ये वाढविण्यात मदत होऊन देशातील बेरोजगारांची संख्या कमी होऊ शकते. आकडेवारीनुसार, आपल्या देशातील ६० टक्केपेक्षा जास्त तरुण रोजगाराला पात्र नसुन बेरोजगार आहेत. यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या जास्त आहे. या तरुणांना कौशल्य प्रशिक्षण आवश्यक आहे. सहकार मित्र योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार देशातील तरुणांना विविध क्षेत्रात / क्षेत्रांत प्रशिक्षण देऊन पुढे जाण्यास मदत करेल. यासाठी तरुणांना इंटर्नशिप तसेच ४ महिने मासिक पगाराची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वावलंबी भारत मोहिमेअंतर्गत युवकांना प्रशिक्षण देण्याचे काम सहकार मित्र योजनेच्या अंमलबजावणीद्वारे केले जाईल.



सहकार मित्र इंटर्नशिप योजना 2022 पात्रता निकष | Sahakar Mitra Internship Scheme 2022 Eligibility Criteria

  • या योजनेचा लाभ फक्त भारतीय नागरिक घेऊ शकतात, त्याशिवाय इतर कोणत्याही राष्ट्राची व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाही.
  • या योजनेसाठी कोणत्याही क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे किंवा शिक्षण पूर्ण केले आहेत तेदेखील या योजनेत अर्ज करू शकतात.
  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कृषी आणि संबंधित क्षेत्रातील आणि आयटी क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थी अर्ज करू शकतील.

सहकार मित्र इंटर्नशिप योजना 2022 आवश्यक कागदपत्रे | Sahakar Mitra Internship Scheme 2022 Required Documents

  • आधार कार्ड (Aadhar card)
  • ईमेल आयडी (Email Id)
  • वय प्रमाणपत्र (Age certificate)
  • मोबाइल नंबर (mobile number)

सहकार मित्र योजना 2022 अंतर्गत कोणत्या क्षेत्रात इंटर्नशिप करता येईल?| In which field internship can be done under Sahakar Mitra Yojana 2022?

  • आयटी
  • प्रकल्प व्यवस्थापन
  • वित्त
  • शेती व संबंधित क्षेत्र
  • आंतरराष्ट्रीय व्यापार
  • वनीकरण
  • ग्रामीण विकास
  • सहकार्य
  • प्रकल्प व्यवस्थापन

सहकार मित्र योजनेचे फायदे लाभ कोणते? | What are the benefits of Sahakar Mitra Yojana?

  • देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील.
  • इंटरंशिप चा कालावधी समाप्त झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाईल.
  • या योजनेतून देशातील तरुण युवकांना सक्षम केले जाईल.
  • तरुणांसाठी व्यवसाय करण्यासाठी आत्मविश्वास वाढला जाईल.
  • योजनेंतर्गत इंटर्नशिप दरम्यान युवकांना आर्थिक मदत दिली जाईल.




सहकार मित्र इंटर्नशिप योजना 2022 ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया | digital india internship scheme 2021 online apply

  1. सर्वप्रथम या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सहकार मित्र योजनेच्या http://sip.ncdc.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
  2. यानंतर वेबसाइटचे मुख्यपृष्ठ आपल्यासमोर उघडेल.
  3. वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर आपल्याला “ New Registration” या पर्यायावर क्लिक करावे लागेल .
  4. त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल.
  5. http://sip.ncdc.in/Register.aspx या लिंक वर आपल्याला एक फॉर्म दिसेल,
  6. या फॉर्ममध्ये आपल्याला आपले नाव, ईमेल आयडी, डीओबी (जन्म तारीख), मोबाइल नंबर, संकेतशब्द इत्यादी माहिती प्रविष्ट करावी लागेल आणि “ Register” या बटणावर क्लिक करावे लागेल.
  7. अशा प्रकारे सहकार मित्र योजना 2022 मधील आपली नोंदणी यशस्वी होईल.
  8. यानंतर तुम्ही यूजर आयडी व पासवर्ड देऊन वेबसाइटवर लॉग इन करू शकता.




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top