ONGC मध्ये 3614 पदांवर निघाली मेगा भरती । ONGC Bharti 2022
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ONGC Limited) अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 3614 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2022 आहे
एकून जागा – 3614 जागा
पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी (Apprentices)
शैक्षणिक पात्रता – Bachelor’s degree/ ITI/B.Sc / Diploma (Refer PDF)
वयोमर्यादा – 18 ते 24 जागा
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 27 एप्रिल 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2022
अधिकृत वेबसाईट – www.ongcindia.com.
कोण अर्ज करू शकतो?
- अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह कॉमर्समध्ये बॅचलर डिग्री.
- ऑफिस असिस्टंट ग्रॅज्युएट
- सेक्रेटरियल असिस्टंट – स्टेनोग्राफी (इंग्रजी) / सेक्रेटरीयल प्रॅक्टीसमध्ये आयटीआय
- कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) – संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय
- ड्राफ्ट्समन (सिव्हिल), इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, आयसीटीएसएम – संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय,
- लेबोरिटी असिस्टंट (केमिकल पांट) – पीसीएम किंवा पीसीबीमधून बीएससी किंवा लॅब असिस्टंट (केमिकल पांट) मध्ये आयटीआय.
- मशिनिस्ट, मशिनिस्ट (मोटर व्हेईकल), मेकॅनिक डिझेल, एमएलटी (कार्डिओ आणि फिजिओलॉजी पॅथॉलॉजी. रेडिओलॉजी), रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक, सर्वेयर आणि वेल्डर – संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय.
- सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रूमेंटेशन, मेकॅनिकल – संबंधित ट्रेडमधील इंजिनीअरिंग डिपोमा असणे आवश्यक
- १५ मे २०२२ रोजी उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २४ वर्षांपेक्षा जास्त नसावे. एससी, एसटी, दिव्यांग आणि इतर उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.
ONGC रिक्त पद २०२२ साठी अर्ज कसा करावा ?
ओएनजीसी ट्रेड आणि टेक्निशियन शिकाऊ भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार नॅशनल ट्रेनिंग अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम (National Training Apprenticeship Training Scheme, (NATS) पोर्टल, apprenticeshipindia.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. २७ एप्रिलपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून उमेदवारांना १५ मे २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. ओएनजीसीने दिलेल्या वेळापत्रकानुसार नोंदणीकृत उमेदवारांचा निकाल २३ मे २०२२ रोजी जाहीर केला जाणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
1. या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
3. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे..
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 में 2022 आहे.
5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
मूळ जाहिरात (Notification) – PDF