Van Vibhag Bharti 2026: वन विभागात 10वी, 12वी पासवर भरती!! लवकर अर्ज करा

Van Vibhag Bharti 2026: सरकारी विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी पुसद वनविभागामार्फत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. उपवनसंरक्षक, पुसद वनविभाग, पुसद यांच्या कार्यालयामार्फत विविध श्रेणीतील पदांसाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Pusad Forest Department Recruitment 2026

एकूण जागा : 22 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील:

पदांचे नाव आणि रिक्त जागांचा तपशील

या भरतीमध्ये एकूण चार प्रकारच्या पदांसाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

अ.क्र. पदाचे नाव रिक्त जागा
1 डेटा एंट्री ऑपरेटर 08
2 वाहन चालक 07
3 रखवालदार/चौकीदार 04
4 जलद कृती बचाव दल मजूर 03
एकूण जागा  22

शैक्षणिक पात्रता | Education Qualification :

1. डेटा एंट्री ऑपरेटर

  • उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असावा.
  • MS-CIT किंवा समकक्ष संगणक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र आवश्यक.
  • MS Office, MS Word, MS Excel, PowerPoint आणि इंटरनेट वापरण्याचे ज्ञान असावे.
  • मराठी आणि इंग्रजी भाषेत टायपिंग करता यावे.
  • ई-मेल वापरण्याचे ज्ञान असावे.
  • स्थानिक रहिवासी किंवा कार्यालयीन ठिकाणी राहण्यास तयार असावा.

2. वाहन चालक

  • उमेदवार किमान 8वी उत्तीर्ण असावा.
  • वाहन चालविण्याचा किमान 5 ते 7 वर्षांचा अनुभव असावा.
  • RTO मान्य वैध हलके वाहन चालविण्याचा परवाना (Driving Licence) आवश्यक.
  • वाहन चालविण्याची चांगली माहिती आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा.
  • वयोमर्यादा 21 ते 45 वर्षे.

3. रखवालदार/चौकीदार/जलद कृती बचाव दल मजूर

  • उमेदवार स्थानिक रहिवासी असावा.
  • वनविभागातील कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
  • जलद कृती दलातील उमेदवारांना वन्यप्राणी हाताळण्याबाबत अनुभव असावा.

पगार | Salary :

निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार दरमहा खालील मानधन देण्यात येणार आहे.

पदाचे नाव दरमहा मानधन
डेटा एंट्री ऑपरेटर ₹16,082
वाहन चालक ₹16,082
रखवालदार/चौकीदार ₹13,947
जलद कृती बचाव दल मजूर ₹13,947

टीप: जाहिरातीतील वेतन तक्त्यानुसार 12% PF आणि 0.75% ESIC सह किमान वेतन देण्याची तरतूद नमूद आहे.

अर्ज फी | Application Fee :

अधिकृत जाहिरातीमध्ये अर्ज फी नमूद केलेली  नाही.

अर्ज करण्याची पद्धत | Apply Process :

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया नसून ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. पात्र संस्था/कंत्राटदार/एजन्सी यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज उपवनसंरक्षक, पुसद वनविभाग कार्यालयात सादर करावा.

अर्जासोबत जोडावयाची महत्त्वाची कागदपत्रे:

  1. EPF नोंदणी प्रमाणपत्र.
  2. ESIC नोंदणी प्रमाणपत्र.
  3. मागील 3 वर्षांचे आयकर प्रमाणपत्र.
  4. वस्तू आणि सेवा कर (GST) नोंदणी प्रमाणपत्र.
  5. रजिस्टर्ड संस्थेचे प्रमाणपत्र.
  6. पॅन कार्ड आणि आधार कार्ड.
  7. सेवा पुरवठादाराचे EPF, ESIC, वस्तू व सेवा कर आणि इतर वैधानिक देयकांबाबत थकबाकी नसल्याचे प्रतिज्ञापत्र.
  8. शासकीय विभाग किंवा संस्थेकडून काळ्या यादीत समाविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

प्रति,

उपवनसंरक्षक,
पुसद वनविभाग, पुसद,
‘वनभवन’ प्रशासकीय इमारत,
मुख्य पोस्ट ऑफिस जवळ, तहसील रोड,
पुसद, ता. पुसद, जि. यवतमाळ – 445204.

अर्ज पाठविताना पाकिटावर “मनुष्यबळ पुरवठा करिता आवेदन” असे स्पष्ट नमूद करावे.

महत्त्वाच्या तारखा | Important Dates :

तपशील तारीख व वेळ
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 22 नोव्हेंबर 2026
अर्ज स्वीकारण्याची अंतिम वेळ सायंकाळी 4:00 वाजेपर्यंत
अर्ज उघडण्याची वेळ सायंकाळी 5:30 वाजता

महत्त्वाच्या लिंक्स | Important Links :

मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!