MPSC Group C Bharti 2026: महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत 16,777 पदांची मेगा भरती!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीमध्ये विविध शासकीय विभागांमधील एकूण 16,777 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांसह अनेक पदांचा या भरतीमध्ये समावेश आहे.

विशेष म्हणजे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 6 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या शुद्धिपत्रकानुसार पदसंख्येत सुधारणा करण्यात आली असून पात्र उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची तसेच काही उमेदवारांना पदांचे पसंतीक्रम सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.




MPSC Group C Bharti 2026

एकूण जागा : 16,717

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ.क्र. पदाचे नाव रिक्त पदे
1 उद्योग निरीक्षक 9
2 तांत्रिक सहाय्यक 3
3 कर सहाय्यक 282
4 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, गट-क 461
5 लिपिक-टंकलेखक 3,966
6 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) 1,840
7 वरिष्ठ अभिलेखपाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखपाल 196
8 सहाय्यक अधीक्षक, गट-क 11
9 सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) 254
10 कनिष्ठ कौशल्य, रोजगार व मार्गदर्शन अधिकारी 32
11 कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 58
12 आदिवासी विकास निरीक्षक 47
13 अन्वेषक 42
14 दूरध्वनीचालक 1
15 पुरवठा निरीक्षक 214
16 उपलेखापाल / मुख्य लिपिक 3
17 सहाय्यक भांडारपाल (सार्वजनिक बांधकाम विभाग) 6
18 पशुधन पर्यवेक्षक 322
19 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (सार्वजनिक बांधकाम विभाग) 934
20 गणित व चित्रकला निर्देशक 241
21 सहाय्यक भांडारपाल 182
22 भांडारपाल 9
23 शिल्प निर्देशक 1,388
24 अधिपरिचारिका 3,911
25 कनिष्ठ रसायनी 153
26 सहाय्यक कृषी अधिकारी 1,203
27 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (जलसंपदा विभाग) 949
एकूण पदे 16,717

1. उद्योग निरीक्षक, गट-क

  • सांख्यिकी, अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान शाखेतील संबंधित पदविका अथवा विज्ञान शाखेतील सांख्यिकी विषयासह पदवी आवश्यक आहे.

2. तांत्रिक सहाय्यक, गट-क

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा शासनमान्य समकक्ष शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे.

3. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, गट-क

  • उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10वी) उत्तीर्ण केलेली असावी. तसेच ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल अभियांत्रिकीमधील निर्धारित पदविका किंवा पदवी आवश्यक आहे. याशिवाय जाहिरातीत नमूद केलेला अनुभव आणि वैध वाहनचालक परवाना आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी PDF पहा

4. कर सहाय्यक, गट-क

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष अर्हता आवश्यक आहे. तसेच मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाची निर्धारित पात्रता आवश्यक आहे.

5. लिपिक-टंकलेखक, गट-क

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा शासनमान्य समकक्ष अर्हता आवश्यक आहे. तसेच निर्धारित मराठी आणि इंग्रजी टंकलेखन पात्रता आवश्यक आहे.

6. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.

7. सहाय्यक अधीक्षक, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, गट-क

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.

8. विविध विभागांतील वरिष्ठ लिपिक, गट-क

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.

9. कनिष्ठ कौशल्य, रोजगार व मार्गदर्शन अधिकारी

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.

10. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी

  • मत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील B.F.Sc. पदवी आवश्यक आहे.

11. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा शासनमान्य समकक्ष शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे.

12. उपलेखापाल / मुख्य लिपिक, आदिवासी विकास विभाग

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.

13. आदिवासी विकास निरीक्षक

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.

14. अन्वेषक, अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.

15. दूरध्वनीचालक, मा. राज्यपालांचे सचिव कार्यालय

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.

16. पुरवठा निरीक्षक

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.

17. सहाय्यक भांडारपाल, सार्वजनिक बांधकाम विभाग

  • कोणत्याही विद्याशाखेतील पदवी किंवा शासनमान्य समकक्ष शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे.

18. पशुधन पर्यवेक्षक, गट-क

  • पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन विषयातील दोन वर्षांची पदविका किंवा पशुसंवर्धन शास्त्रातील पदवी आवश्यक आहे.

19. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सार्वजनिक बांधकाम विभाग

  • स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) शाखेतील पदविका किंवा पदवी अथवा शासनमान्य समकक्ष पात्रता आवश्यक आहे.

20. गणित तथा चित्रकला निर्देशक, गट-क

  • कोणत्याही अभियांत्रिकी शाखेतील पदविका किंवा पदवी अथवा शासनमान्य समकक्ष पात्रता आवश्यक आहे.

21. सहाय्यक भांडारपाल

  • कोणत्याही अभियांत्रिकी शाखेतील पदविका किंवा पदवी अथवा शासनमान्य समकक्ष पात्रता आवश्यक आहे.

22. भांडारपाल

  • कोणत्याही अभियांत्रिकी शाखेतील पदविका किंवा पदवी अथवा शासनमान्य समकक्ष पात्रता आवश्यक आहे.

23. शिल्प निर्देशक, गट-क

  • National Apprenticeship Certificate (NAC), National Trade Certificate (NTC), Craft Instructor Training Scheme प्रमाणपत्र किंवा यांत्रिकी, विद्युत अथवा इलेक्ट्रॉनिक्स विषयातील पदविका किंवा पदवी आवश्यक आहे.

24. अधिपरिचारिका

  • GNM पदविका, B.Sc. Nursing किंवा Post Basic B.Sc. Nursing यापैकी आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे. तसेच महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी आवश्यक आहे.

25. कनिष्ठ रसायनी, गट-क

  • रसायनशास्त्र किंवा रासायनिक तंत्रज्ञान विषयातील पदवी अथवा शासनमान्य समकक्ष शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे.

26. सहाय्यक कृषी अधिकारी

  • कृषी विषयातील किमान पदविका किंवा कृषी पदवी अथवा कृषी विषयातील उच्च शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

27. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, जलसंपदा विभाग

  • स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) शाखेतील पदविका किंवा पदवी आवश्यक आहे.

वयोमर्यादा | Age Limit :

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी पदानुसार किमान वयोमर्यादा वेगवेगळी आहे. खुल्या आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची विशेष सवलत लागू करण्यात आली आहे.

  • खुला प्रवर्ग (Open): कमाल वयोमर्यादा 39 वर्षे.

  • मागासवर्गीय प्रवर्ग: कमाल वयोमर्यादा 44 वर्षे.

  • दिव्यांग उमेदवार: संबंधित पदाच्या सेवा नियमांनुसार वयोमर्यादा व सवलत लागू राहील.

  • किमान वयोमर्यादा: पदानुसार 18 किंवा 19 वर्षे अथवा संबंधित संवर्गाच्या सेवा नियमानुसार.

महत्त्वाची सूचना: वयाची गणना करण्याचा दिनांक आणि पदनिहाय वयोमर्यादा संबंधित संवर्गाच्या नियमांनुसार निश्चित केली जाईल. 5 नोव्हेंबर 2026 च्या शासन निर्णयानुसार एक वर्षाची कमाल वयोमर्यादा सवलत लागू आहे.

 

महत्त्वाच्या तारखा | Important Dates : 

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : 13 नोव्हेंबर 2026

  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 27 नोव्हेंबर 2026

  • परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 30 नोव्हेंबर 2026

  • पूर्व परीक्षेची तारीख :  24 जानेवारी 2027

महत्त्वाच्या लिंक्स | Important Links :

मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता  येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!