Mumbai High Court Recruitment 2026: मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद आस्थापनेवर “स्वयंपाकी (Cook)” पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज फक्त Speed Post द्वारे पाठवायचा असून अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2026 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत आहे.
Mumbai High Court Recruitment 2026
एकूण जागा : 18 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
- स्वयंपाकी – 18 पदे
- दिव्यांगांसाठी 1 पद राखीव
- 17 उमेदवारांची निवड यादी
- 4 उमेदवारांची प्रतीक्षा यादी
शैक्षणिक पात्रता | Educational Qualification
या भरतीसाठी उमेदवार किमान इयत्ता 4 थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे चारित्र्य व वर्तणूक चांगली असणे आवश्यक आहे.
- मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे.
- स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- स्वयंपाकाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- शाकाहारी तसेच मांसाहारी खाद्यपदार्थ बनवता येणे आवश्यक आहे.
- मान्यताप्राप्त संस्थेचे स्वयंपाक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य दिले जाईल.
वयोमर्यादा | Age Limit
जाहिरात प्रसिद्ध झालेल्या तारखेला उमेदवाराचे वय:
- किमान वय – 18 वर्षे
- कमाल वय – 38 वर्षे
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वय – 43 वर्षे
न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयोमर्यादेची अट लागू नाही; मात्र त्यांनी त्यांच्या कार्यालयामार्फत अर्ज करणे आवश्यक आहे.
स्वयंपाकाचा अनुभव व प्राधान्य | Cooking Experience
स्वयंपाकी पदासाठी अनुभवाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. जाहिरातीनुसार कुकिंगमधील पदवी/पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार तसेच पंचतारांकित किंवा त्रितारांकित हॉटेलमध्ये शेफ/स्वयंपाकी म्हणून कामाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.
मान्यताप्राप्त संस्थेत स्वयंपाकी म्हणून दोन किंवा दोनपेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांनाही प्राधान्य दिले जाईल.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे | Required Documents
उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या Self Attested प्रती जोडणे आवश्यक आहे.
प्रमुख कागदपत्रे:
- शैक्षणिक पात्रतेची गुणपत्रके व प्रमाणपत्रे
- जन्मतारखेचा पुरावा
- दिव्यांगत्व प्रमाणपत्र, लागू असल्यास
- जात प्रमाणपत्र, लागू असल्यास
- स्वयंपाकाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र
- स्वयंपाक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र, असल्यास
- महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र
- नाव बदलाचा पुरावा, लागू असल्यास
- सेवायोजन कार्यालय नोंदणी प्रमाणपत्र, असल्यास
- विशेष अर्हतेचे प्रमाणपत्र
- आधार कार्डची प्रत
- न्यायालय प्रशासनाने मागितलेली इतर कागदपत्रे
अनुभवाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित हॉटेल/केटरिंग व्यावसायिकाने दिलेले योग्य अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. Appointment Letter, Offer Letter किंवा Pay Slip अनुभवाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही.
अतिरिक्त कागदपत्रे | Additional Documents
अर्जासोबत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच्या तारखेची दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य प्रमाणपत्रे, लहान कुटुंबाबाबतचे प्रतिज्ञापन, शासकीय कर्मचारी असल्यास NOC, स्वतःचा पत्ता लिहिलेले ₹5 चे पोस्टाचे तिकीट लावलेले कोरे पाकीट, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि उमेदवाराला बनवता येणाऱ्या खाद्यपदार्थांची यादी जोडणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा? | How to Apply
मुंबई उच्च न्यायालय स्वयंपाकी भरतीसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा नसून ऑफलाइन अर्ज करावा लागणार आहे.
उमेदवारांनी जाहिरातीसोबत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात आणि अर्ज फक्त Speed Post द्वारे खालील पत्त्यावर पाठवावा.
पत्ता:
प्रबंधक (प्रशासन)
मुंबई उच्च न्यायालय,
खंडपीठ औरंगाबाद,
जालना रोड,
छत्रपती संभाजीनगर – 431009
अर्ज 10 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी कार्यालयात पोहोचणे आवश्यक आहे. Speed Post व्यतिरिक्त इतर माध्यमातून आलेले किंवा अंतिम तारखेनंतर पोहोचलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अर्जाच्या पाकिटावर काय लिहावे?
अर्ज पाठवताना पाकिटावर ठळक अक्षरात:
“स्वयंपाकी या पदाकरिता अर्ज”
असे लिहिणे आवश्यक आहे.
अर्ज फी | Application Fee
अर्ज सादर करताना कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
मात्र अर्जांची छाननी झाल्यानंतर Shortlisted Candidates यांनाच ₹200 चा नॉन-रिफंडेबल Demand Draft किंवा Postal Order काढावा लागेल. हा DD/Postal Order “Registrar High Court Bench at Aurangabad” यांच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेतून काढावा लागेल.
निवड प्रक्रिया | Selection Process
या भरतीची निवड प्रक्रिया एकूण 50 गुणांची आहे.
| निवड प्रक्रिया | गुण |
| स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा | 30 |
| शारीरिक कार्यक्षमता चाचणी | 10 |
| तोंडी मुलाखत | 10 |
| एकूण | 50 |
स्वयंपाकाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत किमान 15 गुण मिळवणे आवश्यक आहे. प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास उमेदवार पुढील चाचण्यांसाठी पात्र राहणार नाही.
निवड यादी व प्रतीक्षा यादी | Selection & Waiting List
उमेदवारांची निवड स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि तोंडी मुलाखतीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.
गुणवत्ताक्रमानुसार निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. ही यादी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
निवड यादी आणि प्रतीक्षा यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून दोन वर्षे वैध राहतील.
महत्त्वाच्या तारखा | Important Dates
| जाहिरात प्रसिद्ध दिनांक | 17 ऑगस्ट 2026 |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 10 सप्टेंबर 2026 |
| अर्ज पोहोचण्याची अंतिम वेळ | सायं. 5:00 वाजेपर्यंत |
| अर्ज पद्धती | फक्त Speed Post |
| परीक्षा तारीख | नंतर अधिकृत वेबसाइटवर जाहीर |
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा
