पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026: शेतकऱ्यांना ₹2 लाखांपर्यंत कर्जमाफी | Shetkari Karjmafi Yojana 2026

Shetkari Karjmafi Yojana 2026: महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026” जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ₹2 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देखील दिला जाणार आहे.



योजनेची मुख्य वैशिष्ट्ये

  • योजनेचे नाव: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026
  • जास्तीत जास्त कर्जमाफी: ₹2 लाख
  • प्रोत्साहनपर लाभ: ₹50,000 पर्यंत
  • राज्यातील पात्र शेतकऱ्यांना लाभ
  • ऑनलाइन पद्धतीने अंमलबजावणी

कोणत्या कर्जांना लाभ मिळणार?

01 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज, जे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असून 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड झालेले नाही, अशा कर्जांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह ₹2 लाखांपर्यंत कर्जमाफी दिली जाईल.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

2022-23, 2023-24 आणि 2024-25 या आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत घेतलेल्या पीक कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे.



OTS (One Time Settlement) सुविधा

ज्या शेतकऱ्यांची थकबाकी ₹2 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांनी अतिरिक्त रक्कम बँकेत भरल्यानंतर उर्वरित ₹2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ घेता येईल. त्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

कोण लाभासाठी पात्र असतील?

  • महाराष्ट्रातील पात्र शेतकरी
  • राष्ट्रीयकृत, खाजगी, ग्रामीण व सहकारी बँकांचे कर्जदार
  • आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले शेतकरी
  • AgriStack मध्ये नोंदणी केलेले शेतकरी

कोण अपात्र असतील?

खालील व्यक्तींना योजनेचा लाभ मिळणार नाही:

  • विद्यमान व माजी मंत्री, खासदार, आमदार
  • सरकारी अधिकारी व कर्मचारी (₹25,000 पेक्षा जास्त वेतन)
  • आयकर भरणारे व्यक्ती
  • सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे अधिकारी
  • ₹25,000 पेक्षा जास्त पेन्शन घेणारे व्यक्ती (माजी सैनिक वगळून)



अर्ज प्रक्रिया

या योजनेची संपूर्ण अंमलबजावणी ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. यासाठी शासन स्वतंत्र पोर्टल आणि मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे.

अधिकृत GR पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈

 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top