India's New Educational Era

भारताचं नविन शैक्षणिक पर्व: केंद्रीय मंत्रिमंडळाने NEP 2020 ला दिली मान्यता | India’s New Educational Era

India’s New Educational Era: ३४ वर्षांनंतर शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करणाऱ्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) ला भारत सरकारच्या मंत्रिमंडळाने अखेर मंजुरी दिली आहे. यामुळे देशभरात एकसमान व नाविन्यपूर्ण शिक्षण प्रणाली लागू होणार आहे.



नवीन शिक्षण रचना – ५+३+३+४ फॉर्म्युला

नवीन धोरणानुसार शिक्षणाची रचना पुढील प्रमाणे असेल:

पायाभूत टप्पा (Foundation Stage – 5 वर्षे):

  • नर्सरी (४ वर्षे)
  • कनिष्ठ केजी (५ वर्षे)
  • वरिष्ठ केजी (६ वर्षे)
  • इयत्ता १ (७ वर्षे)
  • इयत्ता २ (८ वर्षे)




पूर्वतयारी टप्पा (Preparatory Stage – 3 वर्षे):

  • इयत्ता ३ ते ५ (९–११ वर्षे)

मध्यवर्ती टप्पा (Middle Stage – 3 वर्षे):

  • इयत्ता ६ ते ८ (१२–१४ वर्षे)

माध्यमिक टप्पा (Secondary Stage – 4 वर्षे):

  • इयत्ता ९ ते १२ (१५–१८ वर्षे)

महत्वाचे बदल | Important changes

  • केवळ इयत्ता १२ वीला बोर्ड परीक्षा घेण्यात येईल; १० वीची परीक्षा आता अनिवार्य नसेल.
  • एमफिल अभ्यासक्रम रद्द केला जाईल.
  • महाविद्यालयीन पदवी ३ किंवा ४ वर्षांची असेल:
    • १ वर्ष → प्रमाणपत्र
    • २ वर्षे → डिप्लोमा
    • ३ वर्षे → पदवी
    • ४ वर्षांची पदवी → थेट एमए प्रवेश
  • MA नंतर थेट PhD करण्याची संधी मिळेल.
  • अभ्यासक्रमाच्या दरम्यान ब्रेक घेण्याचा पर्याय उपलब्ध.
  • ५ वी पर्यंतचा अभ्यास मातृभाषा / प्रादेशिक भाषेत.
  • ९ वी ते १२ वी – सेमिस्टर पद्धती राबवली जाईल.




उच्च शिक्षणात बदल  | Changes in Higher Education

  • २०३५ पर्यंत प्रवेश दर (GER) ५०% पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट
  • शैक्षणिक, प्रशासकीय आणि आर्थिक स्वायत्तता
  • एकत्रित संस्था संचालन धोरण
  • ई-कोर्सेस प्रादेशिक भाषांमध्ये
  • व्हर्च्युअल लॅब आणि NETF (National Educational Technology Forum) ची स्थापना
मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top