Savitribai Fule Schme: महाराष्ट्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी अर्थ सहाय्य योजना | वार्षिक खर्चासाठी मिळणार अनुदान | Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana
Savitribai Fule Schme: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने विषयी माहिती जाणून घेणार आहे त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. (Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana)
Savitribai Fule Schme For OBC Students
वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्याबाबत राबविण्यात येणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम व सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाच्या धर्तीवर इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता योजना सुरु करण्यास मा मंत्रिमंडळाने दि.१९.१०.२०२३ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे.
त्यानुसार, सदर बैठकीत विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, अधिछात्रवृत्ती, वसतिगृह व वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता, स्वाधार, स्वयंम अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये तसेच यापुढे प्रस्तावित करण्यात येणाऱ्या योजनांमध्ये एकसमानता रहावी यासाठी सर्वंकष घोरण निश्चित करण्याबाबत संदर्भाधिन क्र.६ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
सदर शासन निर्णयान्वये मा.अ.मु.स. (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली दि.०१.१२.२०२३ रोजी आयोजित बैठकीत झालेल्या निर्णयानुसार इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता निर्वाह भत्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले /घेणारे भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून), आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योजना लागू करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय -:
आदिवासी विकास विभागाची स्वयंम योजना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता निर्वाह भत्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले / घेणारे भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा ६०० या प्रमाणे एकूण २१,६०० विद्यार्थ्यांकरिता “ज्ञानज्योती
सावित्रीबाई फुले आधार योजना” राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
०२. सदर योजनेंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी खालीलप्रमाणे निश्चित केल्यानुसार विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम वितरीत करण्यात यावी
०३. सदर योजनेसाठी रु. १०० कोटी इतक्या वार्षिक खर्वारा मान्यता देण्यात येत आहे.
०४. सदर योजनेंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष व इतर अनुषंगिक बाबी संदर्भात स्वतंत्ररित्या शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल.
०५. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१०९१/२०२३/व्यय-१४. दि.१३.११.२०२३ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
०६. सदरहू शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२३१२१३१६४५४१५७३४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा GR पाहण्यासाठी
👇👇👇👇