SBI Clerk Recruitment 2026: भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये Junior Associate (Customer Support & Sales) या पदासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Regular 7,680 आणि Backlog 1,444 अशा एकूण 9,124 जागा आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 11 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. महाराष्ट्रासाठी 1,718 Regular + 281 Backlog = 1,999 जागा उपलब्ध आहेत.
SBI Clerk Bharti 2026
एकूण जागा : 9,124
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या
| पदाचे नाव | Regular पदे | Backlog पदे | एकूण पदे |
|---|---|---|---|
| Junior Associate (Customer Support & Sales) | 7,680 | 1,444 | 9,124 |
SBI च्या अधिकृत जाहिरातीनुसार ही भरती Clerical Cadre मध्ये Junior Associate पदासाठी आहे.
महाराष्ट्रातील रिक्त पदे
| राज्य | Regular | Backlog | एकूण |
|---|---|---|---|
| महाराष्ट्र | 1,718 | 281 | 1,999 |
शैक्षणिक पात्रता | Education Qualification :
SBI Clerk 2026 साठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) असणे आवश्यक आहे.
पदवीची पात्रता 31 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे. अंतिम वर्ष/सेमिस्टरचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात; मात्र निवड झाल्यास त्यांनी 31 डिसेंबर 2026 पर्यंत पदवी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा | Age Limit :
वयोमर्यादा 1 एप्रिल 2026 रोजी मोजली जाणार आहे.
- किमान वय – 20 वर्षे
- कमाल वय – 28 वर्षे
- उमेदवाराचा जन्म 2 एप्रिल 1998 ते 1 एप्रिल 2006 या कालावधीत झालेला असावा.
वयामध्ये सवलत
| प्रवर्ग | वयोमर्यादा सवलत |
|---|---|
| OBC | 3 वर्षे |
| SC/ST | 5 वर्षे |
| PwBD General/EWS | 10 वर्षे |
| PwBD OBC | 13 वर्षे |
| PwBD SC/ST | 15 वर्षे |
| Ex-Servicemen | नियमानुसार |
- General / OBC / EWS – ₹750
- SC / ST / PwBD / XS / DXS – शुल्क नाही
- अर्ज शुल्क Non-Refundable आहे
निवड प्रक्रिया | Selection Process :
SBI Junior Associate भरतीची निवड प्रक्रिया मुख्यतः तीन टप्प्यांत होईल:
1. Preliminary Examination
पूर्व परीक्षेत एकूण 100 प्रश्न आणि 100 गुण असतील. परीक्षेचा कालावधी 1 तास असेल.
| विषय | प्रश्न | गुण | वेळ |
|---|---|---|---|
| English Language | 30 | 30 | 20 मिनिटे |
| Numerical Ability | 35 | 35 | 20 मिनिटे |
| Reasoning Ability | 35 | 35 | 20 मिनिटे |
| एकूण | 100 | 100 | 1 तास |
चुकीच्या उत्तरासाठी संबंधित प्रश्नाच्या गुणांच्या 1/4 गुणांची निगेटिव्ह मार्किंग आहे.
2. Main Examination
मुख्य परीक्षेत 190 प्रश्न आणि 200 गुण असतील. परीक्षेसाठी 2 तास 40 मिनिटे वेळ दिला जाईल.
| विषय | प्रश्न | गुण | वेळ |
|---|---|---|---|
| General/Financial Awareness | 50 | 50 | 35 मिनिटे |
| General English | 40 | 40 | 35 मिनिटे |
| Quantitative Aptitude | 50 | 50 | 45 मिनिटे |
| Reasoning Ability & Computer Aptitude | 50 | 60 | 45 मिनिटे |
| एकूण | 190 | 200 | 2 तास 40 मिनिटे |
मुख्य परीक्षेतही चुकीच्या उत्तरासाठी 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे.
3. Local Language Proficiency Test
ज्या उमेदवारांनी 10वी किंवा 12वीमध्ये संबंधित स्थानिक भाषा शिकलेली असल्याचे प्रमाणपत्र/मार्कशीट सादर केले, त्यांना स्वतंत्र भाषा चाचणी द्यावी लागणार नाही.
मात्र संबंधित स्थानिक भाषा शिकलेली नसलेल्या निवड झालेल्या उमेदवारांना Local Language Proficiency Test द्यावी लागेल. ही चाचणी उत्तीर्ण न झाल्यास नियुक्ती दिली जाणार नाही.
महाराष्ट्रासाठी भाषा – मराठी.
एवढा मिळेल पगार :
- ₹24,050 – ₹64,480
SBI Clerk 2026 अर्ज कसा करायचा?
अर्ज करण्याची प्रक्रिया
- SBI च्या अधिकृत Careers वेबसाइटला भेट द्या.
- Recruitment of Junior Associates 2026 ही जाहिरात निवडा.
- New Registration करा.
- वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे/फोटो/स्वाक्षरी अपलोड करा.
- अर्जातील माहिती काळजीपूर्वक तपासा.
- लागू असल्यास ऑनलाइन अर्ज शुल्क भरा.
- अर्ज Submit करा.
- Submitted Application Form ची Print/PDF प्रत सुरक्षित ठेवा.
बँकेने उमेदवारांना अंतिम तारखेची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर अर्ज करण्याचा सल्ला दिला आहे. अर्ज Submit केल्यानंतर माहितीमध्ये बदल/Correction करण्याची संधी नसल्याचे जाहिरातीत नमूद आहे.
अधिकृत ऑनलाइन अर्ज – SBI Careers – Current Openings
महत्त्वाच्या तारखा | Important Dates :
| ऑनलाइन अर्ज सुरू | 11 ऑगस्ट 2026 |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 31 ऑगस्ट 2026 |
| Preliminary Exam | सप्टेंबर 2026 – संभाव्य |
| Main Exam | नोव्हेंबर 2026 – संभाव्य |
या तारखा SBI च्या जाहिरातीनुसार आहेत आणि परीक्षा वेळापत्रकात बँकेकडून बदल होऊ शकतो.
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- एका उमेदवाराला फक्त एका State/UT साठी अर्ज करता येईल.
- एकापेक्षा जास्त अर्ज करू नयेत.
- महाराष्ट्रासाठी अर्ज करत असल्यास स्थानिक भाषा मराठी आहे.
- 10वी/12वीमध्ये मराठी विषयाचा पुरावा असल्यास स्थानिक भाषा चाचणी लागू होणार नाही.
- SBI Clerical Cadre मध्ये सध्या कार्यरत उमेदवार या भरतीसाठी पात्र नाहीत.
- अर्जातील माहिती भरताना विशेष काळजी घ्या.
- अर्ज शुल्क भरल्यानंतर ते परत मिळणार नाही.
- परीक्षा केंद्रावर Mobile Phone, Smart Watch, Calculator यांसारखी उपकरणे नेण्यास मनाई आहे.
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा
