VANARTI Exam Time Table 2026: वनार्टी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी चाळणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पाहा संपूर्ण Schedule

VANARTI Mock Test 2026: महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (VANARTI), नागपूर यांनी सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरिता घेण्यात येणाऱ्या CBT (Computer Based Test) चाचणी परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. संबंधित परिपत्रक दि. 27 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आले असून, परीक्षा 11 व 12 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहेत.

या परीक्षांमध्ये मिलिटरी/पोलीस भरती, SSC-CGL, RRB, IBPS-PO/Banking/LIC AAO, MBA-CAT/CMAT-CET आणि TAIT या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

VANARTI Exam Time Table 2026




VANARTI Exam Test 2026 परीक्षा वेळापत्रक 

प्रशिक्षण परीक्षा दिनांक वेळ कालावधी
मिलिटरी / पोलीस भरती (Batch-1) 11 ऑगस्ट 2026 सकाळी 9:00 ते 10:00 60 मिनिटे
मिलिटरी / पोलीस भरती (Batch-2) 11 ऑगस्ट 2026 सकाळी 11:00 ते 12:00 60 मिनिटे
SSC-CGL 11 ऑगस्ट 2026 दुपारी 1:00 ते 3:00 120 मिनिटे
RRB (रेल्वे भरती) 11 ऑगस्ट 2026 सायंकाळी 4:00 ते 6:00 120 मिनिटे
IBPS-PO / Banking / LIC AAO 12 ऑगस्ट 2026 सकाळी 9:00 ते 11:00 120 मिनिटे
MBA-CAT / CMAT-CET 12 ऑगस्ट 2026 दुपारी 12:00 ते 2:00 120 मिनिटे
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 12 ऑगस्ट 2026 दुपारी 3:00 ते 5:00 120 मिनिटे

वरील वेळापत्रक अधिकृत परिपत्रकानुसार देण्यात आले आहे.

प्रवेशपत्र (Admit Card)

  • प्रवेशपत्र परीक्षेच्या तीन दिवस आधी वनार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल.
  • उमेदवारांनी स्वतःचे प्रवेशपत्र ऑनलाइन डाउनलोड करावे.
  • प्रवेशपत्रावरील परीक्षा केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदलण्यात येणार नाही.

परीक्षेचे स्वरूप

  • परीक्षा Computer Based Test (CBT) पद्धतीने घेतली जाईल.
  • सर्व अर्जदारांना चाचणी परीक्षेला उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • गुणवत्ता यादी (Merit List) चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधारे तयार केली जाईल.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी उपस्थित राहा.
  • मूळ आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
  • परीक्षा हॉलमध्ये मोबाईल, स्मार्ट वॉच, इअरफोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, पुस्तके किंवा इतर साहित्य नेण्यास मनाई आहे.
  • परीक्षा सुरू झाल्यानंतर प्रवेश दिला जाणार नाही.
  • परीक्षा संपण्यापूर्वी परीक्षा हॉल सोडता येणार नाही.
  • परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.




दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष सूचना

वनार्टीने दिव्यांग उमेदवारांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

  • किमान 40% दिव्यांग प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • आवश्यक असल्यास Compensatory Time (अतिरिक्त वेळ) दिला जाईल.
  • प्रत्येक तासासाठी 20 मिनिटे अतिरिक्त वेळ उपलब्ध राहील.
  • लेखक (Scribe) घेणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करावीत.
  • लेखकाने वैध फोटो ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.

प्रशिक्षण निवड प्रक्रिया

  • सर्व अभ्यासक्रमांसाठी प्रथम चाचणी परीक्षा घेतली जाईल.
  • परीक्षेतील गुणवत्तेनुसार मेरिट लिस्ट तयार केली जाईल.
  • निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
  • आवश्यक असल्यास प्रतीक्षा यादी (Waiting List) प्रसिद्ध करण्यात येईल.
  • परीक्षा वेळापत्रकात बदल झाल्यास माहिती केवळ अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

आवश्यक कागदपत्रे

  • ई-प्रवेशपत्र (E-Admit Card)
  • आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स
  • साधा बॉलपेन
  • आवश्यक असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र व संबंधित कागदपत्रे.




महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइट: https://www.vanarti.in

आधिकृत जाहिरात (PDF) : इथे क्लिक करा

Notice Board: https://www.vanarti.in/en/notice-board/

ई-मेल: vanarti.info@gmail.com

संपर्क क्रमांक: 7887882026

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!