BEST बस चालक भरती 2026: 10वी पास उमेदवारांसाठी बस चालक पदांची भरती; ऑनलाइन अर्ज सुरू

Mumbai BEST Bus Driver Bharti 2026: मुंबईतील बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमाने बस चालक (Bus Driver) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये 364 रिक्त पदे भरली जाणार असून 10वी उत्तीर्ण आणि वैध जड वाहन चालक परवाना (Heavy Vehicle Driving Licence) असलेले उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 08 जुलै 2026 ते 29 जुलै 2026 दरम्यान सुरू राहणार आहे.




Mumbai  BEST Bus Driver Bharti 2026

एकूण जागा : 364 जागा 

पदाचे नाव आणि रिक्त पदांचा तपशील :

पदाचे नाव पद संख्या
बस चालक (Bus Driver) 364

प्रवर्गनिहाय जागा : 

  • खुला (Open): 142
  • SC: 34
  • ST: 22
  • VJ(A): 06
  • NT(B): 06
  • NT(C): 10
  • SBC: 05
  • OBC: 67
  • EWS: 36
  • SEBC: 36

शैक्षणिक पात्रता | Education Qualification 

  • 10वी (SSC) उत्तीर्ण
  • किमान 50% गुण (राखीव प्रवर्गासाठी नियमानुसार सवलत)
  • मराठी विषयासह SSC उत्तीर्ण
  • RTO मान्यताप्राप्त Heavy Vehicle Driving Licence
  • वैध Badge आवश्यक

वयाची अट | Age Limit 

21 जुलै 2026 रोजी

  • खुला प्रवर्ग: 24 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय: 24 ते 43 वर्षे

शारीरिक पात्रता | Physical Qualification 

  • उंची किमान १५४ से. मी. असणे आवश्यक तसेच कमाल १७८ से. मी. पेक्षा जास्त नसावी.
  • वजन किमान ४५ कि. ग्रॅ. असणे आवश्यक.

वेतन | Salary 

  • मूळ वेतन: ₹22,050/-
  • महागाई भत्ता
  • घरभाडे भत्ता
  • वैद्यकीय भत्ता
  • गणवेश धुलाई भत्ता
  • रजा प्रवास भत्ता
  • BEST बसमधून मोफत प्रवास सुविधा




निवड प्रक्रिया | Selection Process 

  1. ऑनलाइन अर्ज
  2. CBT परीक्षा
  3. कागदपत्र पडताळणी
  4. अंतिम गुणवत्ता यादी

परीक्षा पद्धत (CBT)

विषय गुण
अंकगणित 10
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 10
भाषा ज्ञान (मराठी व इंग्रजी) 10
एकूण 30

टीप: प्रत्येक विषयात किमान 3 गुण आणि एकूण सरासरी 12 गुण मिळवणे आवश्यक आहे.




अर्ज फी | Application Fee : 

प्रवर्ग शुल्क
खुला प्रवर्ग ₹1000/-
राखीव प्रवर्ग ₹900/-

महत्त्वाच्या तारखा :

  • ऑनलाइन अर्ज सुरू : 08 जुलै 2026
  • ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख : 29 जुलै 2026
  • CBT परीक्षा : नंतर जाहीर करण्यात येईल




Important Links

Official Notification (PDF) इथे क्लिक करा
Online Apply इथे क्लिक करा 
Official Website इथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!