Vidyadhan Scholarship Maharashtra 2026

Vidyadhan Scholarship Maharashtra 2026: 10वी पास विद्यार्थ्यांना ₹75,000 पर्यंत शिष्यवृत्ती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Vidyadhan Scholarship Maharashtra 2026: महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवंत विद्यार्थ्यांसाठी Vidyadhan Scholarship 2026 ही मोठी संधी आहे. Sarojini Damodaran Foundation (SDF) मार्फत राबविण्यात येणाऱ्या या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 11वी, 12वी तसेच पुढील उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी मोठा आधार मिळतो. महाराष्ट्रातील पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.




Vidyadhan Scholarship 2026 Overview

घटकतपशील
शिष्यवृत्तीचे नावVidyadhan Scholarship Program 2026
संस्थाSarojini Damodaran Foundation (SDF)
पात्रता10वी (SSC/CBSE/ICSE) उत्तीर्ण
अर्ज पद्धतOnline
राज्यमहाराष्ट्र
अधिकृत वेबसाईटwww.vidyadhan.org




पात्रता निकष

सामान्य प्रवर्गातील विद्यार्थी

  • 10वी परीक्षेत किमान 85% गुण किंवा 8.9 CGPA आवश्यक

दिव्यांग विद्यार्थी

  • 10वी परीक्षेत किमान 75% गुण किंवा 7.9 CGPA आवश्यक

कौटुंबिक उत्पन्न

  • वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹2,00,000 पेक्षा कमी असावे

शिष्यवृत्तीची रक्कम

11वी आणि 12वी शिक्षणासाठी

  • दरवर्षी ₹10,000 शिष्यवृत्ती




पदवी अभ्यासक्रमासाठी

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अभ्यासक्रमानुसार:

  • ₹10,000 ते ₹75,000 पर्यंत वार्षिक शिष्यवृत्ती

दिल्या जाऊ शकते.

महत्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 ऑगस्ट 2026
ऑनलाइन चाचणी23 ऑगस्ट 2026
मुलाखत कालावधी29 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2026

पुढील शिक्षणासाठी पात्र अभ्यासक्रम

  • इयत्ता 11वी (Junior College)
  • Polytechnic Diploma
  • ITI अभ्यासक्रम

आवश्यक कागदपत्रे

  • 10वीची गुणपत्रिका
  • उत्पन्नाचा दाखला
  • रेशन कार्ड (उपलब्ध असल्यास)
  • पासपोर्ट साइज फोटो
  • आधार कार्ड
  • बँक खाते तपशील




निवड प्रक्रिया

Vidyadhan Scholarship साठी विद्यार्थ्यांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:

  1. Online Application
  2. Merit Based Shortlisting
  3. Online Test
  4. Personal Interview
  5. Final Selection

अर्ज कसा करावा?

  1. Vidyadhan च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  2. Student Registration करा.
  3. Scholarship Program Maharashtra 2026 निवडा.
  4. आवश्यक माहिती भरा.
  5. कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज Submit करा.

Vidyadhan Scholarship चे फायदे

  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत
  • 11वी ते पदवीपर्यंत शिष्यवृत्ती
  • गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन
  • उच्च शिक्षणासाठी आर्थिक आधार




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top