Maharashtra Fire Service Recruitment 2026

Maharashtra Fire Service Recruitment 2026 | महाराष्ट्र अग्निशामक भरती आणि प्रशिक्षण अभ्यासक्रम २०२७ | पात्रता व ऑनलाईन अर्ज प्रक्रिया!

Maharashtra Fire Service Admission 2026: जर तुम्ही अग्निशमन दलात (Fire Department) करिअर करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. महाराष्ट्र अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालय, महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी (मुंबई) यांच्या वतीने सन २०२७ च्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अधिकृत जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरती/प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती, पात्रता, महत्त्वाच्या तारखा आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा, याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे.




अभ्यासक्रमांचे नाव व कालावधी (Courses Details)

महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमीद्वारे खालील दोन मुख्य निवासी (Residential) अभ्यासक्रमांसाठी फक्त पुरुष उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत:

क्र. अभ्यासक्रमाचे नाव कालावधी सत्र / बॅच
उपस्थानक अधिकारी आणि अग्नि प्रतिबंधक अधिकारी अभ्यासक्रम- २०२७ १ वर्ष (निवासी) जुलै २०२७ ते जून २०२८
अग्निशामक प्रशिक्षण अभ्यासक्रम २०२७ ०६ महिने (निवासी)

बॅच १: जानेवारी २०२७ ते जून २०२७

 

बॅच २: जुलै २०२७ ते डिसेंबर २०२७




महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

उमेदवारांनी नोंद घ्यावी की ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मर्यादित कालावधी देण्यात आला आहे:

  • ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: १५ जून २०२६

  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १५ ऑगस्ट २०२६

पात्रता आणि इतर अटी (Eligibility Criteria)

या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या खाजगी तरुण व तडफदार उमेदवारांसाठी खालील बाबींची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे:

प्रवेशासाठी पात्रता निकष (Eligibility Criteria)

उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आणि त्याला मराठी भाषा येणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा (Age Limit)

(ऑनलाईन अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी उमेदवाराचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे )

  • अग्निशामक पाठयक्रम: १८ ते २३ वर्षे.

  • उपस्थानक व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठयक्रम: १८ ते २५ वर्षे.

  • वयामध्ये सवलत: अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विमुक्त जाती (VJ), भटक्या जमाती (NT), विशेष मागास प्रवर्ग (SBC) उमेदवारांसाठी ५ वर्षे शिथिल; तर इतर मागासवर्गीय (OBC) आणि ईडब्ल्यूएस (EWS) उमेदवारांसाठी ३ वर्षे शिथिल.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • अग्निशामक पाठयक्रम: मान्यताप्राप्त संस्थेतून मराठी विषयासह पहिल्या प्रयत्नात किमान १० वी (SSC) उत्तीर्ण. (खुल्या प्रवर्गासाठी किमान ५०% गुण आणि राखीव प्रवर्ग/EWS साठी ४५% गुण आवश्यक) .

  • अधिकारी पाठयक्रम: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी (Degree) उत्तीर्ण. (खुल्या प्रवर्गासाठी किमान ५०% गुण आणि राखीव प्रवर्ग/EWS साठी ४५% गुण आवश्यक) .

शारीरिक आणि वैद्यकीय पात्रता (Physical & Medical Standards)

  • उंची: किमान १६५ सें.मी.

  • वजन: किमान ५० किलो

  • छाती: सर्वसाधारण ८१ सें.मी. आणि फुगवून ८६ सें.मी. (किमान ५ सें.मी. छाती फुगवणे आवश्यक) .

  • वैद्यकीय मापदंड: डोळ्यांची दृष्टी चष्म्याशिवाय ६/६ असावी आणि उमेदवार रंगअंध (Color Blind) नसावा. शारीरिक व्यंगत्व, सपाट पाय (Flat Foot), गुडघे टेकलेले (Knock Knees), तिरकस डोळे किंवा बोबडेपणा नसावा.




परीक्षा आणि प्रवेश अर्ज शुल्क (Application Fee)

अर्ज शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने (क्रेडिट/डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI) स्वीकारले जाईल:

प्रवर्ग (Category) अग्निशामक पाठयक्रम उपस्थानक अधिकारी पाठयक्रम
खुला प्रवर्ग (General)

रु. ६००/-

रु. ७५०/-

राखीव प्रवर्ग / EWS

रु. ५००/-

रु. ६००/-




प्रशिक्षण कालावधीतील अंदाजित खर्च (Estimated Course Expenses)

हे प्रशिक्षण निवासी असल्याने प्रशिक्षणार्थींना खालीलप्रमाणे अंदाजित खर्च स्वतः करावा लागेल:

  • प्रशिक्षण शुल्क (Training Fee): अग्निशामक पाठयक्रमासाठी रु. १३,०००/- तर अधिकारी पाठयक्रमासाठी रु. ३६,४००/-.

  • निवास खर्च (Hostel): अग्निशामक पाठयक्रमासाठी रु. ५० ते ७० प्रतिदिन; अधिकारी पाठयक्रमासाठी रु. १०० प्रतिदिन.

  • भोजन खर्च (Mess): दोन्ही अभ्यासक्रमांसाठी अंदाजे रु. ३००/- प्रतिदिन.

  • गणवेश व इतर साहित्य: दोन्हीसाठी अंदाजे रु. १०,०००/-.

निवड प्रक्रिया आणि गुणदान पद्धत (Selection Process)

उमेदवारांची निवड एकूण १५० गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी (Merit List) लावून केली जाईल:

A. शारीरिक चाचणी व अतिरिक्त गुण (एकूण ५० गुण):

  • उंचीनुसार गुण: १६५ ते १६८ सेमी असल्यास ५ गुण, तर १८३ सेमीपेक्षा जास्त असल्यास १० गुण मिळतात.

  • छाती फुगवण्यानुसार गुण: ६ सेमी फुगवल्यास ५ गुण, तर ११ सेमी किंवा अधिक फुगवल्यास १० गुण.

  • अतिरिक्त बोनस गुण (Bonus Marks): * ड्रायव्हिंग लायसन्स (LMV – २ गुण, HMV – ३ गुण).

    • NCC प्रमाणपत्र (A – १ गुण, B – २ गुण, C – ३ गुण).

    • सिव्हिल डिफेन्स कोर्स (२ गुण) , होमगार्ड प्रशिक्षण (२ गुण).

    • खेळाडू उमेदवारांसाठी (जिल्हास्तर ३ गुण, राज्यस्तर ४ गुण, राष्ट्रीयस्तर ५ गुण).

    • अतिरिक्त उच्च शिक्षणासाठी २ ते ५ गुणांपर्यंत सवलत.

B. ऑनलाईन परीक्षा (एकूण १०० गुण):

शारीरिक चाचणीत पात्र ठरलेले उमेदवार १०० गुणांच्या बहुपर्यायी (MCQ) ऑनलाईन परीक्षेसाठी पात्र होतील. परीक्षेचा कालावधी १.५ ते २ तास असेल.

  • विषय: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान (विज्ञान विषयासह), आणि बौद्धिक क्षमता चाचणी (गणित).

🎯 Passing marks: एकूण १५० गुणांपैकी अधिकारी पाठ्यक्रमासाठी किमान ५० गुण आणि अग्निशामक पाठ्यक्रमासाठी किमान ४५ गुण मिळवणे अनिवार्य आहे.




कागदपत्र पडताळणीचे ठिकाण (Document Verification)

ऑनलाईन अर्जाची प्रिंट आणि सर्व मूळ कागदपत्रे घेऊन उमेदवारांना खालील पत्त्यावर पडताळणीसाठी उपस्थित राहावे लागेल:

महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, हंस भुग्रा मार्ग, विद्यानगरी, सांताक्रुझ पूर्व, मुंबई ४०००९८. (कागदपत्र पडताळणीचे सविस्तर वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल )

ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply Online)

१. सर्वात आधी महाराष्ट्र अग्निशमन सेवेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: www.mahfireservice.gov.in

२. होम पेजवर दिलेल्या “जाहिर सूचना – २०२६” किंवा “Admission 2027” या लिंकवर क्लिक करा.

३. सविस्तर जाहिरात आणि माहिती पुस्तिका (Brochure) काळजीपूर्वक वाचा.

४. ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये आपली वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अचूक भरा.

५. आवश्यक ती कागदपत्रे आणि फोटो अपलोड करा.

६. अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट आउट काढून ठेवा.




महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top