Bharti Airtel Scholarship 2026: जर तुम्ही नुकतीच १२ वी उत्तीर्ण केली आहे आणि देशातील नामांकित कॉलेजेसमध्ये इंजिनिअरिंग (B.E./B.Tech) किंवा तंत्रज्ञान अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे, तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारती एअरटेल फाउंडेशन (Bharti Airtel Foundation) तर्फे गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘भारती एअरटेल स्कॉलरशिप २०२६’ ची घोषणा करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च म्हणजेच १००% कॉलेज फी, हॉस्टेल आणि मेसचा खर्च थेट फाउंडेशनमार्फत उचलला जाणार आहे. या लेखात आपण या स्कॉलरशिपची पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कसा करावा, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Bharti Airtel Scholarship 2026
Bharti Airtel Scholarship 2026 – थोडक्यात माहिती
| योजनेचे नाव | भारती एअरटेल स्कॉलरशिप २०२६-२७ |
| कोणाद्वारे सुरू | भारती एअरटेल फाउंडेशन |
| लाभ | १००% वार्षिक फी माफी, मोफत लॅपटॉप, हॉस्टेल आणि मेसचा खर्च |
| पात्रता | इंजिनिअरिंग / ५ वर्षीय इंटिग्रेटेड टेक कोर्सचे प्रथम वर्ष विद्यार्थी |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३१ जुलै २०२६ |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन (Online) |
या स्कॉलरशिपचे मुख्य फायदे (Benefits)
भारती एअरटेल स्कॉलरशिप ही केवळ पैशांची मदत करत नाही, तर विद्यार्थ्याचा संपूर्ण शैक्षणिक प्रवास सोपा करते:
१. १००% फी माफी: तुमच्या इंजिनिअरिंग कोर्सची पूर्ण वार्षिक फी दिली जाईल (५ वर्षांपर्यंतच्या कोर्ससाठी लागू).
२. हॉस्टेल आणि मेसचा खर्च: कॉलेजच्या हॉस्टेल आणि मेसचा पूर्ण खर्च यातून कव्हर केला जातो. जर विद्यार्थी बाहेर PG किंवा प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये राहत असेल, तर नियमानुसार त्याला मदत दिली जाईल.
३. मोफत लॅपटॉप: पहिल्याच वर्षी प्रत्येक निवड झालेल्या विद्यार्थ्याला अभ्यासासाठी एक ब्रँडेड लॅपटॉप मोफत दिला जाईल.
महत्त्वाची अट: शिक्षण पूर्ण झाल्यावर आणि चांगली नोकरी मिळाल्यानंतर, या योजनेतील विद्यार्थ्यांना भविष्यात किमान एका गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची (स्वइच्छेने) शपथ घ्यावी लागते, जेणेकरून ही मदतीची साखळी सुरू राहील. तसेच दरवर्षी किमान ५ झाडे लावून त्यांचे संवर्धन करावे लागेल.
अर्ज करण्यासाठी पात्रता (Eligibility Criteria)
या स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
-
शैक्षणिक पात्रता: विद्यार्थी देशातील Top 50 NIRF रँकिंग असलेल्या इंजिनिअरिंग कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये प्रथम वर्षात (Academic Year 2026-27) प्रवेश घेतलेला असावा.
-
मान्यताप्राप्त कोर्सेस: Electronics and Communication, Telecom, Information Technology, Computer Science, Data Science, Aerospace, आणि Emerging Technologies (AI, Machine Learning, Robotics, IoT, AR/VR).
-
उत्पन्नाची अट: कुटुंबाचे (आई-वडील) वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असणे बंधनकारक आहे.
-
विशेष प्राधान्य: मुली (Girl Students), दिव्यांग विद्यार्थी, अनाथ किंवा सिंगल पेरेंट (आई किंवा वडील नसलेले) आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपमध्ये विशेष प्राधान्य दिले जाईल.
-
इतर अट: अर्जदार विद्यार्थी इतर कोणत्याही सरकारी किंवा खाजगी स्कॉलरशिपचा लाभ घेत नसलेला असावा.
आवश्यक कागदपत्र (Required Documents)
ऑनलाईन अर्ज करताना खालील कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल:
- आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (Government ID Proof)
- चालू वर्षाचा कॉलेज प्रवेशाचा पुरावा (Admission Letter / Fee Receipt)
- इयत्ता १२ वीची मार्कशीट (Class 12 Marksheet)
- JEE स्कोरकार्ड किंवा संबंधित प्रवेश परीक्षेचे गुणपत्रक
- उत्पन्नाचा दाखला: पालकांच्या नोकरीचे Income Tax Return (ITR) फॉर्म किंवा सरकारी महसूल अधिकाऱ्याचा उत्पन्नाचा दाखला (गेल्या ६ महिन्यांच्या बँक स्टेटमेंटसह).
- बँक खाते तपशील (विद्यार्थी आणि पालक दोघांचे पासबुक/स्टेटमेंट)
- पासपोर्ट साईझ फोटो
- स्टेटमेंट ऑफ पर्पज (SOP) – स्कॉलरशिप का हवी आहे याबद्दल थोडक्यात माहिती.
ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply)
या स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून ती Buddy4Study पोर्टलवरून करायची आहे:


