SPI Chhatrapati Sambhaji Nagar Entrance Exam 2025

महाराष्ट्रातील युवकांना संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची सुवर्णसंधी | SPI Chhatrapati Sambhaji Nagar Entrance Exam 2025

SPI Chhatrapati Sambhaji Nagar Entrance Exam 2025: संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांनी जास्तीत जास्त संख्येने जावे, ह्यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे संस्थेची स्थापना केलेली आहे. जून २०२५ मध्ये सुरू होणा-या छत्रपती संभाजीनगर येथील ४९ व्या तुकडीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.


SPI Chhatrapati Sambhaji Nagar Entrance Exam 2025

पात्रता : (अ) अविवाहित (मुलगा). (ब) महाराष्ट्राचे अधिवासी (Domicile) तसेच कर्नाटक राज्यातील फक्त बिदर, बेळगावी अणि कारवार जिल्हयाचे अधिवासी. (क) जन्म तारीख ०२ जानेवारी २००८ ते ०१ जानेवारी २०११ च्या दरम्यान, (ङ) मार्च एप्रिल मे २०२५ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला बसणारा. (इ) जून-२०२५ मध्ये इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा.

शारीरिक पात्रता :

  • सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावा.
  • UPSC ने NDA आणि INA साठी दिलेल्या सर्व शारीरिक निकषांस पात्र असावा. हे निकष UPSC तथा संस्थेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.
  • काही प्रमुख निकष पुढीलप्रमाणेः उंची कमीत कमी १५० से.मी. वजन ४३ कि.ग्रा, रातांधळेपणा किंवा रंगांधळेपणा नसावा. छाती न फुगवता ७४ से.मी. फुगवून ७९ से.मी. NDA / INA प्रवेशासाठी UPSC च्या आधिसूचनेनुसार डोळ्यांची क्षमता असावी.




लेखी परीक्षा आणि मुलाखत पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून २० एप्रिल २०२५ रोजी विविध केंद्रांवर घेतली जाईल. परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत ६०० मार्काचे बहुपर्यायी Multiple Choice Questions, ७५ प्रश्न गणिताचे आणि ७५ प्रश्न सामान्यज्ञान General Ability Test (GAT) असे एकूण १५० प्रश्न असतील. प्रत्येक योग्य उत्तराला (४) गुण व चुकीच्या उत्तरास (१) गुण मिळतील. लेखी परीक्षा साधारणतः इयत्ता ८ वी ते १० वीच्या स्टेट बोर्ड व सी.बी.एस.ई. च्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

ऑनलाईन अर्ज www.spiaurangabad.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. परीक्षा शुल्क रूपये ४५०/- (परत न करता येण्याजोगे) ऑनलाईन फक्त क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेटबँकीग इत्यादी व्दारे भरावे. डिमांड ड्राफ्ट किंवा चलानव्दारे भरलेले परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही. प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्ती नुसार भरलेला नसल्यास अर्ज नामंजूर होइल. तसेच प्रवेश परीक्षा शुल्क परत मिळणार नाही.




अर्ज कसा करावा? | How To Apply For SPI Chhatrapati Sambhaji Nagar Entrance Exam 2025 :

  • www.spiaurangabad.com या संकेत स्थळावर अर्ज उपलब्ध आहे.
  • परीक्षा शुल्क रूपये ४५०/- (परत न करता येण्याजोगे) ऑनलाईन फक्त क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेटबँकीग इत्यादी व्दारे भरावे.
  • डिमांड ड्राफ्ट किंवा चलानव्दारे भरलेले परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही.
  • प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्ती नुसार भरलेला नसल्यास अर्ज नामंजुर होइल, तसेच प्रवेश परीक्षा शुल्क परत मिळणार नाही.
  • प्रवेश अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख आणि वेळ २८ फेब्रुवारी २०२५ संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत.
  • हॉल तिकीट : दिनांक १० एप्रिल २०२५ सकाळी १०.०० वा. नंतर संस्थेच्या संकेत स्थळावरून डाऊनलोड करून घेता येतील.

परीक्षा संबधीत सुचनांसाठी वेळोवळी www.spiaurangabad.com हे संकेत स्थळ वेळोवळी तपासावे. इतर कोठेही हया बाबत सुचना दिल्या जाणार नाहीत.

मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top