Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५०००; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात आणखी कोणत्या योजना आहेत? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष राष्ट्रवादीने बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सरकारच्या लाडकी बहिन योजनेची मासिक आर्थिक मदत 2,100 रुपये करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार महिलांना मासिक १५०० रुपये देत आहे. राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठीच्या शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम 12,000 रुपयांवरून 15,000 रुपये वार्षिक करण्याचे आश्वासन दिले आहे.




Ladki Bahin Yojana Update 2024 

अजित पवार यांनी बारामतीत जाहीरनामा प्रसिद्ध केला
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीचा भाग आहे. या युतीतील तिसरा पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. आघाडी अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात 52 जागांवर निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादीनेही जागानिहाय जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, विजयानंतर विधानसभा मतदारसंघात पक्ष कोणती विकासकामे करणार हे त्या जाहीरनाम्यात सांगण्यात आले आहे. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी बारामतीत तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. दरम्यान, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियात जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि पक्षाच्या उमेदवारांनी आपापल्या विधानसभा मतदारसंघात जाहीरनामा प्रसिद्ध केला. 



जाहीरनाम्यात काय आहे?

  • लाडकी बहीण योजेनच्या पैशात वाढ करत असून ती रक्कम 1500 वरून आम्ही 2100 रुपये करणार आहोत. 2 कोटी 30 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
  • शेतकरी सन्मान योजना आम्ही 15 हजार रुपये करणार आहोत. कर्जमाफी आणि अतिरिक्त अनुदान आम्ही देणार आहोत. 20 टक्के अधिक अनुदान असेल.
  • राज्यातील ग्रामीण भागात 45 हजार पानंद रस्ते करणार आहोत, असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीरनाम्यात सांगण्यात आलं आहे.
  • महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिलांना पोलिस दलात समावेश करण्याचा वादा करण्यात आला आहे
  • धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.
  • ग्रामीण भागात 45000 पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा वादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेला आहे.
  • शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेती पिकांच्या एम.एस.पी वरती 20% अनुदान देण्याचा वादा अजित दादांच्या पक्षाकडून करण्यात आलेला आहे.
  • वीज बिलात 30% कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याचा वादा करण्यात आला आहे.
  • वृद्ध पेन्शन धारकांना आता पंधराशे वरुण महिन्याला 2100 रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.
  • दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतनाचा वादा करण्यात आलेला आहे.
  • 25 लाख रोजगार निर्मितीचा वादा देखील केला आहे.

🙏🏻 कृपया ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा



अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपला Whatsapp Channel Join  करण्यासाठी  👉यथे क्लिक करा 👈

 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top