Maratha Reservation Benefits In Recruitment

मराठा तरुणांसाठी खुशखबर! मराठा तरुणांना एसईबीसी सोबत नॉनक्रिमिलेअर दाखला मिळणार

Maratha Reservation Benefits In Recruitment: मराठा तरुणांसाठी आनंदाची बातमी! SEBC चे दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता जातीच्या दाखल्यांसोबतच नॉनक्रिमिलेअरचे दाखले मिळणार आहेत. पोलिस भरतीसह इतर शासकीय नोकऱ्या देणाऱ्या उमेदवारांना याचा फायदा होणार आहे. यामुळे दोन प्रमाणपत्र एकाच वेळी काढत येणार आहे. मागील काही दिवसांत राज्य सरकारच्या पोर्टलवर २०१४चा अध्यादेश (जीआर) असल्याने ‘एसईबीसीचे दाखले देण्यास अडचणी येत होत्या. यामुळे पोलीस भरतीसह इतर सरकारी भरतीपासून मराठा तरुण वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. तांत्रिक अडचण लक्षात घेऊन सरकारने पोलिस भरतीसाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे.




 राज्यात सध्या १७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत आता १५ एप्रिलपर्यंत आहे. मराठा समाजातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास तरुणांना (एसईबीसी) या भरतीत आरक्षण आहे. पण, त्यांना अद्याप ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र मिळाले नसून त्याची मुदत देखील ३० ते ४५ दिवस असल्याने भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांना त्याची पोच पावती चालणार आहे.

जातीच्या दाखल्यांसोबत नॉनक्रिमिलेअर
• जातीचे प्रमाणपत्र घेताना नॉनक्रिमिलेअरची कागदपत्रे जोड़ा
• तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला १९६७ पूर्वीचा जातीचा पुरावा स्वतःचा शाळेचा दाखला
• रहिवाशी दाखला
• सेतूमधून ऑनलाइन फॉर्म

तांत्रिक अडचण दूर
शासनाच्या पोर्टलवर कोटनि रद्द केलेला २०१४वा ‘एसईबीसी’चा जीआर येत होता. नवीन
२०२४चा जीआर अपडेट नसल्याने दाखले देता येत नव्हते.
आता नवीन परिपत्रकात जातीच्या
दाखल्यासोबत नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्याचे आदेश आहेत.



एसईबीसी आणि नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्रासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे  पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top