police-army-ssc-gd-bharti-free-trainingfor-maharashtra-student

Police Bharti, SSC GD, Army Bharti मोफत Training | Barti Yojana Pune

Police Bharti, SSC GD, Army Bharti Free Training: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसुचित जातीतील युवक-युवतींना पोलीस, मिलिटरी आणि पॅरा मिलिटरी भरती पूर्व निःशुल्क आणि निवासी प्रशिक्षणाकरीता महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (MESCO) प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून पुणे, सातारा, आणि बुलढाणा या ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. (Police, Army & SSC GD Bharti Training For Maharashtra Student)



Police Bharti, SSC GD, Army Bharti Free Training

एकूण जागा : 250

अनु. क्र. प्रशिक्षण संस्थेचे नाव एकूण जागा
1 महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या, (MESCO) पुणे 50
2 महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या, (MESCO) सातारा  80
3 महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या, (MESCO) बुलढाणा  120
एकूण   250



पात्रता :

  1. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  2. उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा.
  3. पोलीस भरती करीता उमेदवाराचे वय १९ ते ३२ वर्षापर्यंत असावे व मिलिटरी भरती करीता वय १७ ते २१ वर्षापर्यंत असावे.
  4. पोलीस भरती करीता उमेदवार किमान १२ वी उत्तीर्ण असावा व मिलिटरी भरती करीता किमान १० वी उत्तीर्ण असावा.)
  5. पुरुष उमेदवारांची उंची किमान १६५ से.मी. व महिला उमेदवारांसाठी किमान १५५ से.मी. असावी.
  6. पोलीस, मिलिटरी व पॅरा मिलिटरी भरतीच्या शारीरिक क्षमता चाचणीच्या पात्रतेनुसार उमेदवारांना निकष लागू राहतील.
  7. रु.८ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असलेला उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असतील.

विद्यार्थी निवडीचे निकष :

  • प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने गुणवत्ता यादीतील रु.८ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असलेल्या सर्व पात्र उमेदवारांना प्रवेश देण्यात येईल.



आरक्षण :

  • ३०% जागा महिलांसाठी राखीव
  • ५% जागा अनुसूचित जाती अंतर्गत वंचित जाती मधील मांग, मातंग, होलार, वाल्मिकी, मादगी या व इतर तत्सम जातीसाठी राखीव
  • एकूण जागांच्या ५% जागा विशेष बाब म्हणून राखीव

प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती :

  • ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख ३१/१२/२०२३
  • प्रशिक्षण कालावधी- ३ महिने (निवासी)
  • प्रशिक्षण कालावधी मध्ये विद्याथ्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय प्रशिक्षण केंद्रात केली जाईल. सदर योजनेचाबत / प्रशिक्षणाचाबत काही वाद अथवा धोरणात्मक पेच/प्रसंग
  • निर्माण झाल्यास याबाबतचे अंतिम सर्व अधिकार मा. महासंचालक, बार्टी व शासनास राहतील.
  • प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधीमध्ये शासकीय/निमशासकीय/खाजगी ठिकाणी नोकरी व व्यवसाय करता येणार नाही.
  • ज्या उमेदवारांनी यापूर्वी बार्टी, पुणे मार्फत पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण, बँक (IBPS) रेल्वे, एल. आय. सी. इ. व तत्सम स्पर्धा परीक्षा, MPSC व UPSC परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण यापूर्वी घेतले असेलत्यांची पुन्हा नव्याने प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार नाही.
  • इच्छुक व पात्र उमेदवारांनी दि. १९/१२/२०२३ पासून http://mescoltd.co.in/Barti.aspx. या लिंकवर ऑनलाईन अर्जाची नोंदणी करावी.

अर्ज करण्यासाठी – येथे क्लिक करा 

मूळ जाहिरात पाहण्यासाठी – येथे क्लिक करा 



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top