Adivasi Vikas Vibhag Bharti 2023: आदिवासी विकास विभागात विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी बंपर भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Adivasi Vikas Vibhag Bharti 2023
एकूण जागा : 602
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक | 14 |
2 | संशोधन सहाय्यक | 17 |
3 | उपलेखापाल-मुख्य लिपिक | 30 |
4 | आदिवासी विकास निरिक्षक | 08 |
5 | वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक | 187 |
6 | लघुटंकलेखक | 05 |
7 | गृहपाल (पुरुष) | 43 |
8 | गृहपाल (स्त्री) | 25 |
9 | अधिक्षक (पुरुष) | 26 |
10 | अधिक्षक (स्त्री) | 48 |
11 | ग्रंथपाल | 38 |
12 | प्रयोगशाळा सहाय्यक | 29 |
13 | उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) | 11 |
14 | सहाय्यक ग्रंथपाल | 01 |
15 | उच्च माध्यमिक शिक्षण सेवक | 14 |
16 | प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) | 48 |
17 | प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) | 27 |
18 | माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) | 15 |
19 | उच्च श्रेणी लघुलेखक | 03 |
20 | निम्न श्रेणी लघुलेखक | 13 |
एकूण जागा | 602 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक :
- मान्यताप्राप्त विद्यापिठाची किमान व्दितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी स्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहिल.
संशोधन सहाय्यक :
- मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
उपलेखापाल-मुख्य लिपिक :
- मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील
आदिवासी विकास निरिक्षक :
- मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक :
- मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य राहील
लघुटंकलेखक :
- ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी किंवा शासनमान्य समकक्ष परिक्षा उत्तीर्ण केली असावी. आणि जी व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल. (महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र
गृहपाल (पुरुष) :
- मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखे तील मान्यता प्राप्त विद्यापीठा ची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार
गृहपाल (स्त्री) :
- समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार
अधिक्षक (पुरुष) :
- मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार
अधिक्षक (स्त्री) :
- मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार
ग्रंथपाल :
- ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे. परंतू ग्रंथालयशास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान दोन वर्षांपेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीक्रम राहील
प्रयोगशाळा सहाय्यक :
- ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) :
- मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
सहाय्यक ग्रंथपाल :
- ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केले आहे.
उच्च माध्यमिक शिक्षण सेवक :
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच बी.एड. व समकक्ष पदवी धारण करणारा उमेदवार
प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) :
- उमेदवाराचे इयत्ता १ ते १२ वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे आवश्यक आहे तसेच डी.एड पदवीका इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- शिक्षण पात्रता परिक्षा (Teacher Eligibility Teacher Test Eligibility /Central Test) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) :
- उमेदवार एसएससी / एचएससी अधिक डी.एड व समकक्ष अर्हता धारण करणारा असावा.
- शिक्षण पात्रता परिक्षा (Teacher Eligibility Test /Central Teacher Eligibility Test) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे
माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) :
- उमेदवार पदवी अधिक बी.एड व समकक्ष अर्हता धारण करणारा असावा.
उच्च श्रेणी लघुलेखक :
- शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम
निम्न श्रेणी लघुलेखक :
- शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम
एवढा मिळेल पगार (Salary) :
- वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक 38600-122800
- संशोधन सहाय्यक 38600-122800
- उपलेखापाल-मुख्य लिपिक 35400-112400
- आदिवासी विकास निरिक्षक 35400-112400
- वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक 25500-81100
- लघुटंकलेखक 25500-81100
- गृहपाल (पुरुष) 38600-122800
- गृहपाल (स्त्री) 38600-122800
- अधिक्षक (पुरुष) 25500-81100
- अधिक्षक (स्त्री) 25500-81100
- ग्रंथपाल 25500-81100
- प्रयोगशाळा सहाय्यक 19900-63200
- उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) 35400-112400
- सहाय्यक ग्रंथपाल 21700-69100
- उच्च माध्यमिक शिक्षण सेवक मानधन-२०,०००
- प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) मानधन १६,०००
- प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) मानधन १६,०००
- माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) मानधन १८,०००
- उच्च श्रेणी लघुलेखक 41800-132300
- निम्न श्रेणी लघुलेखक 38600-122800
वयोमर्यादा (Age Limit) : 18 वर्षे ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
अर्ज फी (Application Fee) :
- राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 900/-
- खुली श्रेणी (इतर सर्वांसाठी): रु. 1000/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 डिसेंबर 2023
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा