Mahaforest Bharti 2023: महाराष्ट्र वन विभागाअंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहवे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी मुलाखतीची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Mahaforest Bharti 2023
एकूण जागा : 16
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | जीवशास्त्रज्ञ | 01 |
3 | पशुवैद्यकीय अधिकारी | 01 |
3 | निसर्ग पर्यटन व्यवस्थापक | 02 |
4 | सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक | 02 |
5 | उपजीविका तज्ञ | 02 |
6 | सर्वेक्षण सहाय्यक | 01 |
7 | GIS तज्ञ | 01 |
8 | ग्राफिक डिझायनर | 01 |
9 | सिव्हिल इंजिनियर | 01 |
10 | बचाव मदत टीम | 04 |
एकूण जागा | 16 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
1) जीवशास्त्रज्ञ –
- वन्यजीवन विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी / वनस्पतिशास्त्र / पर्यावरणशास्त्रा मध्ये पदव्युत्तर किमान 60% गुणांसह उत्तीर्ण व पीएचडी.
2) पशुवैद्यकीय अधिकारी –
- स्नातकोत्तरमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी. वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस.सी) ला प्राधान्य देण्यात येईल.
3) निसर्ग पर्यटन व्यवस्थापक –
- कोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका
4) सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक –
- कोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका
5) उपजीविका तज्ञ –
- सामाजिक कार्य शाखेत पदव्युत्तर पदवी (MSW) / ग्रामीण व्यवस्थापनात / कृषी व्यवस्थापनात एमबीए ग्रामीण क्षेत्रात उपजिवीका तज्ञ म्हणुन किमान 02 वर्षाचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर व उपजिवीका तज्ञ या कामाचा कमीत कमी 05 वर्षाचा अनुभव.
6) सर्वेक्षण सहाय्यक –
- कोणत्याही शाखेतील पदवीधर, टंकलेखन वेग इंग्रजी 40 शप्रमी, मराठी 30 शप्रमी. सर्वेक्षण / जमीन विषयक / जीआयएस मध्ये अनुभव.
7) GIS तज्ञ –
- विज्ञान पदवी किंवा भूगोल विषयात बी. ए. व जीआयएस विषयाचा कमीत कमी 03 वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव.
8) ग्राफिक डिझायनर –
- कोणत्याही शाखेतील पदवीधर, ग्राफिक डिझायनिंग मध्ये पदवी किंवा पदविका.
9) सिव्हिल इंजिनियर –
- Civil Engineer पदवीधर, सदर क्षेत्रात काम केल्याचा किमान 03 वर्षाचा अनुभव
10) बचाव मदत टीम –
- किमान SSC उत्तीर्ण, MS-CIT उत्तीर्ण, उमेदवारास वन विभागात प्रत्यक्ष वन्यप्राणी बचाव / रेस्क्यु कार्य मोहीमेचा अनुभव प्रमाणपत्र
एवढा मिळेल पगार (Salary) :
- जीवशास्त्रज्ञ रु. 30,000/-
- पशुवैद्यकीय अधिकारी रु. 50,000/-
- निसर्ग पर्यटन व्यवस्थापक रु. 25,000/-
- सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक रु. 15,000/-
- उपजीविका तज्ञ रु. 30,000/-
- सर्वेक्षण सहाय्यक रु. 15,000/-
- GIS तज्ञ रु. 30,000/-
- ग्राफिक डिझायनर रु. 20,000/-
- सिव्हिल इंजिनियर रु. 30,000/-
- बचाव मदत टीम रु. 10,000/-
अर्ज फी (Application Fee) : फी नाही
नोकरी ठिकाण (Job Location) : नागपूर (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 05 ऑगस्ट 2023
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा