SSC Bharti Update 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत तब्बल 73,333 जागांची मेगा भरती करण्याची तयारी सरकार करत आहे. केंद्र सरकारकडून विविध विभागांमधील गट डी पदांवर भरतीसाठी केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमधील रिक्त पदांचा तपशील आयोगाकडे पाठवण्यात आला आहे.
SSC Bharti Update 2022
एवढी पदे भरली जाणार (SSC Recruitment 2022)
विभाग | रिक्त पदे |
कॉन्स्टेबल जीडी | 24,605 |
संयुक्त पदवी स्तर (CGL) | 20,814 |
कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह दिल्ली पोलिस | 6433 |
मल्टी टास्किंग स्टाफ | 4,682 |
उपनिरीक्षक केंद्रीय पोलीस संघटना | 4,300 |
एकत्रित उच्च माध्यमिक स्तर परीक्षा | 2,960 |
माहितीनुसार, गृह मंत्रालयाच्या अंतर्गत विविध विभागांमध्ये सर्वाधिक 28,825 पदे रिक्त आहेत. यानंतर, दिल्ली पोलिसांमध्ये 7,550 पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. रिक्त पदांचा अंतिम आकडा अद्याप जाहीर झाला नाही, त्यामुळे आता पदांची संख्या वाढू किंवा कमी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आयोग लवकरच या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करेल.
कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाचे सचिव गौतम कुमार यांनी 30 सप्टेंबर रोजी एसएससीचे अध्यक्ष आणि सर्व मंत्रालयांना पाठवलेल्या पत्रात 73,335 रिक्त पदे भरण्याची सूचना केली आहे. आयोगाने 2022 च्या कॅलेंडरच्या बहुतेक भरतींवर जाहिराती देखील जारी केल्या आहेत.
अधिकृत वेबसाईट (Official Website) : https://ssc.nic.in/
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click Here
JOIN TELEGRAM PAGE – Click Here