Arogya Vibhag Bharti 2022: सरकारी नोकरीची प्रतीक्षा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून एक मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकार लवकरच येत्या काही महिन्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागात तब्बल 10,127 जागांसाठी मेगाभरती होणार आहे अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीची प्रतीक्षा करत असलेल्या उमेदवारांसाठी हे दिवाळीचं मोठं गिफ्ट असणार आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांसाठी ही मोठी भरती करण्यात येणार आहे. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, लॅब टेक्निशियन अशा अनेक पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे अशी माहिती महाजन यांनी दिली आहे. या पदभरती संदर्भातील ऑफिशिअल नोटिफिकेशन लवकरच जाहीर करण्यात येणार आहे अशीही माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
Arogya Vibhag Bharti 2022
एकूण जागा – 10,127
Arogya Vibhag Bharti 2022 – Important Date
अ क्र. | कार्यक्रम | कालावधी | दिनांक |
1 | बिंदू नामावली अंतिम करणे, रिक्त पदांची संवर्गनिहाय आरक्षण निश्चिती करणे, कंपनीची निवड करणे (आवश्यक असल्यास) व तदनुषंगिक सर्व कामे करणे | 02 महिने | ३१ डिसेंबर, २०२२ पर्यंत. |
2 | पदभरती जाहिरात प्रसिद्ध करणे | 01 आठवडा | ०१ ते ०७ जानेवारी, २०२३ |
3 | उमेदवारांचे अर्ज मागविणे | 15 दिवस | ०८ ते २२ जानेवारी, २०२३ |
4 | उमेदवारी अर्जांची छाननी | 01 आठवडा | २३ ते ३० जानेवारी, २०२३ |
5 | पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे | 03 दिवस | ३१ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी, २०२३ |
6 | जिल्हा परिषद व जिल्हा निवड समितीने/मंडळाने प्रत्यक्ष परिक्षेच्या आयोजनासंदर्भात कार्यवाही करणे | 01 महिना | ०३ फेब्रुवारी, २०२२ ते ०३ मार्च, २०२३ |
7 | पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र तयार करून संबंधित उमेदवारांना उपलब्ध करून देणे | 01 आठवडा | ०४ ते ११ मार्च, २०२३ |
8 | परिक्षेचे आयोजन (ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने)
आरोग्य पर्यवेक्षक – ( सकाळी ११.०० ते ०१.०० वाजता ) औषध निर्माता – (दुपारी ०३.०० ते ०५.०० वाजता ) आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका – ( सकाळी ११.०० ते ०१.०० वाजता) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – (दुपारी ०३.०० ते ०५.०० वाजता) |
०२ दिवस | २५ मार्च, २०२३
२६ मार्च, २०२३ |
9 | अंतिम निकाल जाहीर करणे व पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे | 01 महिना | २७ मार्च ते २७ एप्रिल, २०२३ |
आरोग्य विभाग भरती चा GR पाहण्यासाठी
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click Here
JOIN TELEGRAM PAGE – Click Here