Free Ration Scheme Update : रेशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी!! पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला (PMGKAY) 3 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. आता या योजनेचा लाभ डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. यापूर्वी ही योजना सप्टेंबर 2022 रोजी संपत होती. केंद्राच्या या निर्णयामुळे देशातील 80 कोटींहून अधिक जनतेला याचा लाभ घेता येईल. आता देशातील गरजूंना डिसेंबर 2022 पर्यंत मोफत रेशन मिळत राहील.
प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. ते म्हणाले, “पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत ३० सप्टेंबरला संपणार आहे. ती आता डिसेंबर २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यासाठी ४४ हजार ७६२ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ग्रामीण भागाला ७५ टक्के तर शहरी भागाला ५० टक्के मोफत धान्य दिलं जाणार आहे.”
Free Ration Scheme Update
- प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत योजनेची मुदत वाढ
- डिसेंबरपर्यंत सर्व लाभार्थ्यांना दरमहा प्रति व्यक्ती पाच किलो धान्य दिले जाणार
- या योजनेंतर्गत 80 कोटींहून गरिबांना लाभ मिळणार
कोविड महामारीचे परिणाम आणि इतर विविध कारणांमुळे अवघे जग असुरक्षित परिस्थितीशी दोन हात करत असताना, भारतातील सर्वसामान्य नागरिकांना सहज आणि परवडण्याजोग्या पद्धतीने अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी भारत सर्वतोपरी खबरदारी घेत असून आपल्या देशातील असुरक्षित घटकांसाठी अन्न सुरक्षेची खातरजमा करत आहे.
महामारीच्या कठीण काळातून सर्वसामान्य लोक बाहेर पडत आहेत, हे लक्षात घेत सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. समाजातील गरीब आणि असुरक्षित घटकांना नवरात्र, दसरा, मिलाद-उन-नबी, दिवाळी, छठ पूजा, गुरुनानक देव जयंती, नाताळ असे सण आनंदाने साजरे करता यावेत, या विचाराने हा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी सणांच्या काळात कोणत्याही प्रकारची आर्थिक ओढाताण न करता समाजातील या वर्गाला सहजरित्या अन्नधान्य उपलब्ध होत राहिल, या दृष्टीकोनातून शासनाने या योजनेला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
प्रेस नोट वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1862989
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here