st mahamandal bharti 2022

ST महामंडळात लवकरच मेगा भरती !- MSRTC Bharti Update 2022

MSRTC Bharti 2022 : एसटी महामंडळाने पाच हजार कंत्राटी चालक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकशेखर चन्ने यांनी मंजुरी दिली आहे. त्याची निविदा प्रक्रियाही राबवली जात आहे. हे चालक टप्याटप्प्यात सेवेत येतील आणि गरज असेल त्याप्रमाणे त्यांची भरती होणार आहे.



एलएनजी प्रकल्प रखडलाः डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे तोट्यात चाललेल्या एसटी महामंडळाने आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी महामंडळाने आपल्या ताफ्यातील बहुतांश बसेस ‘एलएनजी ‘वर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महामंडळाला वर्षाकाठी एक हजार कोटींचा फायदा होणार होता. परंतु गेल्या तीन वर्षांपासन या प्रकल्पावर नसतीच चर्चा झाली. या कामासाठी एका कपनीची नियुक्तीही केली. परंतु त्यासाठी लागणारा खर्च व अन्य मुद्द्यावर या कपनीशी चर्चाच सुरू आहे.



एसटीमध्ये सुमारे पाच हजार चालकांची कंत्राटी पद्धतीने भरतीक रण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे याबाबत दोन दिवसांत जाहिरात काढण्यात येणार आहे शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी झालेल्या संपादरम्यानचा लकांविना एसटी प्रवाशांचे हाल झाले होते. एसटी महामंडळाने कंत्राटी चालक भरती करून एसटी सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. संप मिटताच कंत्राटी चालकांची संख्याक मी केली. तसेच मुदत संपलेल्या काहींना मुदतवाढही देण्यात आली. त्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद या विभागांचा समावेश आहे.

st mahamandal bharti 2022




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top