maharashtra-driver-police-bharti-2022-update

पोलीस भरती चालक नवीन GR 2022 | Driver Police Bharti 2022 Update

Driver Police bharti 2022 Update : महाराष्ट्र चालक पोलीस शीपाई भरती 2022 लवकरच सुरु होणार आहे आणि चालक पोलीस शीपाई भरती 2022 ची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला एक प्रश्न भेडसावत होता तो म्हणजे शारीरिक चाचणी (Physical Test) बाबत काही निश्चित काही माहिती अपडेट मिळत नव्हती, तेव्हा दिनांक 27.06.2022 रोजी शासनाने चालक पोलीस शीपाई पद करिता मैदानी चाचणी घेण्याबाबत राजपत्र जाहीर केले आहे. त्या बाबत सविस्तर माहिती पुढील लेखात वाचून समजेल.




दिनांक 27 जून 2022 रोजी Maharashtra Police Bharti 2022 मधील Driver Police constable Physical Exam बाबत महाराष्ट्र शासनाणे राजपत्र प्रकाशित केले आहे या राजपत्रात महाराष्ट्र चालक पोलीस शीपाई भरती 2022 मैदानी परीक्षा बाबत भरती प्रक्रिया राबवितांना चालक पोलीस शीपाई मैदानी परीक्षा घेणे करीत गुण निर्धारित केले आहेत. त्यामध्ये खालील चार्ट मध्ये दर्शवल्या प्रमाणे महाराष्ट्र चालक पोलीस शीपाई भरती 2022 मध्ये शारीरिक चाचणी मध्ये मुख्यतः 02 Event घेण्यात येणार आहेत.



Driver Police Bharti 2022 

पुरुष उमेदवार मैदानी चाचणी गुण:

Event गुण 
1 1600 मीटर धावणे 30
2 गोळा फेक 20
एकून  50




महिला उमेदवार मैदानी चाचणी गुण:

Event गुण 
1 800 मीटर धावणे 30
2 गोळा फेक 20
 एकून  50

महाराष्ट्र पोलीस शीपाई चालक भरती 2022 लेखी चाचणी (१०० गुण):

शारीरिक चाचणीत किमान ५० टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त जागांच्या १:१५ या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी बोलावण्यास पात्र असतील.

स्पष्टीकरण : उदाहरणार्थ, जर अनुसूचित जाती प्रवर्गात १० रिक्त जागा आणि अनुसूचित जमाती प्रवर्गात ५  रिक्त जागा असतील, तर अनुसूचित प्रवर्गातील १५०(१५X१०-१५०) उमेदवारांना गुणवत्तेनुसार सूचीबध्द करण्यात येईल आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील ७५ (१५४५-७५) उमेदवारांना सूचीबद्ध करण्यात येईल.

तथापि, गुणानुक्रमांक १५० वर असलेल्या अनुसूचित जाती प्रवगातील उमेदवार म्हणून अनुसूचित जाती प्रवगातील ज्या उमेदवारांना सारखेच गुणे मिळालेले आहेत असे सर्व उमेदवार, लेखी चाचणीला बसण्यासाठी बोलावण्यास पात्र असतील. त्याचप्रमाणे गुणानुक्रमांक ७५ असलेल्या अनुसूचित जमातीतील ज्या उमेदवारांना ७५ गुणानुक्रमांक असलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार म्हणून सारखेच गुण मिळालेले आहेत असे सर्व उमेदवार, लेखी चाचणीला बसण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.



लेखी चाचणीमध्ये पुढील विषयांचा समावेश असेल

  1. अंकगणित,
  2. सामान्यज्ञान व चालु घडामोडी,
  3. बुध्दीमत्ता चाचणी,
  4. मराठी व्याकरण, आणि
  5. मोटार वाहन चालविणे / वाहतुकी बाबतचे नियम,

लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे इतका असेल, लेखी चाचणीमध्ये विचारलेले प्रश्न वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील आणि ही चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल.




वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी (५० गुण) :

1) लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल.

2) कौशल्य चाचणीमध्ये पुढील चाचण्यांचा समावेश असेल :

  • हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी २५ गुण
  • जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी २५ गुण

3) कौशल्य चाचणीही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत.

४) वाहन चालविण्यातील कौशल्य चाचणीचे निकष, महासंचालकाकडून वेळोवेळी ठरविण्यात येतील.

5) वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्याकरिता समितीमध्ये प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल.

पोलीस महासंचालकांनी त्या घटकासाठी गठीत केलेले निवड मंडळ, हे या नियमांना पोट-नियम ७ व ८ मध्ये नमूद केलेल्या शारीरिक चाचणी व लेखी चाचणी मधील प्राप्त एकत्रित गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करील. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये प्राप्त होणारे गुण एकत्र केल्यानंतर, उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी ही सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे करण्यात येईल.”


महाराष्ट्र चालक पोलीस शीपाई भरती 2022 GR पाहण्यासाठी – येथे क्लिक करा 

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top