Army Agnipath Bharti 2022 Update

Army Agnipath Bharti 2022 Update| मुलींसाठी आनंदाची बातमी

Agnipath Recruitment 2022 : भारतीत सैन्य दलात भरती होण्याची इच्छा असणाऱ्या तरुणींसाठी खुशखबर आहे. केंद्र सरकारने नव्याने घोषणा केलेल्या अग्निपथ योजनेमध्ये तरुणींनाही संधी मिळणार आहे. अग्निवीर होण्याची तरुणींची इच्छा आता पूर्ण होणार आहे. अग्निपथ योजनेमध्ये 20 टक्के जागा तरुणींसाठी राखीव असणार आहेत. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध करण्यात येत आहे परंतु केंद्र सरकार अग्निपथ योजना राबवण्यावर ठाम आहे. लष्करात अग्निपथ योजनेनुसार भरती प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे. या योजनेमधील पहिल्या बेंचमध्ये 20 टक्के जागा तरुणींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.




Agnipath Recruitment 2022

महत्वाच्या तारखा (Important Date) :

  • भारतीय वायुसेनेसाठी अग्निपथ योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या उमेदवाराची 24 जुलै ते 31 जुलै यादरम्यान ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल.
  • 21 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट दरम्यान शारीरिक चाचणी होईल.
  • 29 ऑगस्ट ते 8 नोव्हेंबरपर्यंत वैद्यकीय चाचणी होईल.
  • यामध्ये पात्र ठरणा-या उमेदवारांची यादी 1 डिसेंबर रोजी जारी करण्यात येईल.
  • 30 डिसेंबरपासून प्रशिक्षणाला सुरुवात होईल.




अग्निवीरांना या मिळणार सुविधा (Agnipath Recruitment 2022) :

  • अग्निवीरांना नियमित सैनिकांप्रमाणेच भत्ता मिळेल.
  • सर्व अग्निवीराना वर्षातून 30 दिवसांची सुट्टी मिळेल.
  • प्रत्येक अग्निविराला 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल.
  • याशिवाय सेवा बजावत असताना वीरगती (Agnipath Recruitment 2022) आल्यास त्यांच्या कुटुंबीयांना सुमारे 1 कोटी रुपयांची मदत दिली जाईल.
  • अग्निवीरांना कॅन्टीन सुविधा देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
  • यासोबतच चार वर्षांनंतर निवृत्त होणाऱ्या अग्निवीरांना अनेक सरकारी सेवेमध्ये आरक्षण आणि प्राधान्य दिले जाणार असल्याचे वायू दलाने सांगितलं आहे.




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top