Kirtan Diploma Course

Kirtan Diploma Course : भारती विद्यापीठातून कीर्तनकार होण्याची मोठी संधी

Kirtan Diploma Course: वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य  यांच्यासह सादर करत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला ‘कीर्तन’ असे म्हणतात; आणि हे करणाऱ्या व्यक्तीला ‘कीर्तनकार’. भारतातल्या सर्व प्रदेशांत, सर्व भाषांत आणि सर्व संप्रदायांत कीर्तन हा प्रकार आढळतो. नवविधा भक्तीपैकी कीर्तन हा दुसरा प्रकार आहे. महाराष्ट्रात कीर्तनाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. येथे होणाऱ्या कीर्तनांत नारदीय कीर्तन आणि वारकरी कीर्तन असे दोन मुख्य प्रकार आहेत. नारद हा भारतातील आद्य कीर्तनकार आहे, असे मानले जाते.


Kirtan Diploma Course:

School Of Performing Arts किर्तन पदविका अभ्यासक्रम

या किर्तन पद्धतींचा अभ्यास पारंपरिक पद्धतीने अनेक विद्यार्थी करीत असतात. त्यामुळे किर्तन पद्धतीचा अभ्यास करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्याला किर्तनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळावे. तसेच त्याला हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळावे. यासाठी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् किर्तन पदविका अभ्यासक्रमाला जुलै महिन्यापासून सुरुवात होणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक प्रा. शारंगधर साठे यांनी दिली आहे.

कोर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद – (Kirtan Diploma Course)

‘A’ दर्जा असलेले विद्यापीठ म्हणून नावलौकिक असलेल्या भारती विद्यापीठाने या अभ्यासक्रमाला सहा वर्षांपूर्वी यशस्वीरीत्या सुरुवात केली. आजवर एकूण 3 वर्गांनी हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेलाअसून त्यात 50 हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. भावी काळाचा विचार करता किर्तन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळणे हे अत्यंत महत्वाचे ठरेल.
‘वारकरी’ आणि ‘नारदीय’ किर्तन एकाच वेळी शिकता येणार –

महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच या अभ्यासक्रमात विद्यार्थ्याला वारकरी आणि नारदीय किर्तन या दोन्ही पद्धतींचा अभ्यास एकाच वेळी करता येणार आहे. त्याबरोबरच अभंग, कीर्तन, आख्यान, माहात्म्य, संस्कृत आणि मराठी सुभाषिते, गीतेतील अध्याय, विविध वृत्तांचा अभ्यास तसेच संगीतातील विविध घटकांचा अंतर्भावदेखील या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

कालावधी, पात्रता आणि फी- (Duration, Eligibility and Fee)

  • ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही शिक्षण पद्धतीचा अवलंब असणारा हा अभ्यासक्रम एकूण 4 वर्षांचा आहे.
  • यासाठी कोणत्याही शाखेतून इयत्ता 12 वी पास असणे गरजेचे आहे.
  • अभ्यासक्रमाची फी प्रती वर्षासाठी 18,000/- इतकी आहे.

सुप्रसिद्ध कीर्तनकार अध्यापन करणार. –

सर्वात महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय ख्यातीचे किर्तनकार चारुदत्त आफळे, लोक साहित्य आणि कलांचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, प्रसिद्ध किर्तनकार गणेश महाराज भगत, योगीराज महाराज गोसावी, सचिन महाराज पवार, संतोष महाराज  पायगुडे यांच्यासारख्या विद्वान, उच्चविद्याविभूषित, सुप्रसिद्ध किर्तनकार गुरुजनांद्वारा रितसर गुरुकुल पद्धतीने अध्यापन केले जाणार आहे.सविस्तर माहिती – (Detailed information)

  • अभ्यासक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी  : येथे क्लिक करा 
  • चौकशीसाठी (020) 25421032 किंवा 9860179188 या क्रमांकावर विद्यार्थी संपर्क साधू शकतात. बीव्ही (डीयू) स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, तळमजला, पूना कॉलेज ऑफ फार्मसी, • भारती विद्यापीठ  शैक्षणिक संकुल, पौड रोड, पुणे – 411 038 या पत्त्यावरही तुम्ही भेट देऊन माहिती घेऊ शकता.

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Hereमित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top