उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणा... • शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदानाचे कृषिदिनापासून वाटप • कृषिमूल्य आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक लवकरच करणार • दुधाला एफआरपी देण्यासंदर्भात अभ्यासाअंती निर्णय

गुड न्यूज – नियमित कृषी कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजारांचे अनुदान मिळणार – Karjmafi Niyamit Karjdar

 सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जीवितहानीसारखे गंभीर गुन्हे वगळता शेतकरी आंदोलनांतील शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिले. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून कृषिदिनापासून ५०  हजार रुपये अनुदानाचे वाटप करणार, लवकरच कृषिमूल्य आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूकही करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नियमित कृषी कर्जाची फेड; ५० हजारांचे अनुदान मिळणार – Karjmafi Niyamit Karjdar



उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणा…

  • शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदानाचे कृषिदिनापासून वाटप.
  • कृषिमूल्य आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक लवकरच करणार.
  • दुधाला एफआरपी देण्यासंदर्भात अभ्यासाअंती निर्णय.

पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली. बैठकीला खासदार सदाशिवराव लोखंडे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, कृषिमंत्री दादाजी भुसे, दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह संबंधित खात्यांचे अधिकारी, किसान क्रांती संघटनेचे प्रतिनिधी सरपंच डॉ. धनंजय धनवटे, सुभाषराव कुलकर्णी, सुहासराव वहाडणे, सुभाष वहाडणे, संगीता भोरकडे, विजय सदाफळ, चांगदेव धनवटे, धनंजय जाधव, बाळासाहेब चव्हाण, नामदेव धनवटे, विठ्ठलराव जाधव, मुरलीधर थोरात, अनिल नळे, योगेश रायते, अमोल सराळकर, दत्तात्रय धनवटे, बाळासाहेब भोरकडे, निकिता जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री म्हणाले की, शेतकरी जगला तर राज्य जगेल हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली.

अतिरिक्त उसाचे गाळप करण्यासाठी वाहतूक अनुदान व साखर घट उतारा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या गाळप हंगामात ऊस शिल्लक राहणार नाही. यानंतरही जर ऊस शिल्लक राहिला तर शिल्लक उसाला भरपाई देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. दुग्धविकास विभागामार्फत दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोना संकटाच्या काळातही दूध व्यवसायाला मदत करण्यात आली. दूध उत्पादनवाढीसाठी देशी गाईच्या जातींवर विशेषत्वाने लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. दुधाला एफआरपी देण्यासंदर्भातील प्रस्ताव संबंधित समितीसमोर ठेवून अभ्यासाअंती त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. कांदाचाळी आणि – कोल्ड स्टोअरेजच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुविधा देण्यात येत आहेत.





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top