राज्य सरकार पशुसंवर्धन विभागात 2 हजार 500 पदे भरणार

गुड न्यूज !! मेगा भरती… राज्य सरकार पशुसंवर्धन विभागात 2 हजार 500 पदे भरणार

आनंदाची बातमी!! मेगा भरती… राज्य सरकार पशुसंवर्धन विभागात 2 हजार 500 पदे भरणार

राज्य सरकार पशुसंवर्धन विभागात 2 हजार 500 पदे भरणार

राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागात मोठी भरती होत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटी करणासाठी राज्य सरकारकडून पशुसंवर्धन विभागातील 2 हजार 500 पदे भरण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध होत आहे.

राज्यात मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे विविध शासकीय पदांच्या नियुक्ता रखडल्या होत्या. त्यामुळे आता राज्य शासनाकडून विविध शाखेतील शासकीय पदांच्या भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सांगितले आहे. माहूरझरी (नागपूर) येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचे (उपकेंद्र) लोकार्पण श्री. केदार यांच्या हस्ते झाले; त्यावेळी ते बोलत होते.




यावेळी मंत्री केदार म्हणाले, शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी पशुपालन हा अतिशय महत्वाचा घटक आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सबळीकरणासाठी पशुसंर्वधन विभागातील 2 हजार 500 पदे लवकरच भरण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.

पशुपालन व्यवसायाने कोरोना महामारीच्या काळात शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे. यापुढील काळात पशु व पक्षी पालनातूनच ग्रामस्थांना स्थानिक रोजगारांची निर्मिती करण्यावर भर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच पशुवैद्यकीय रुग्णालयांमुळे शेतकऱ्यांच्या जनावरांना आरोग्यविषयक सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध झाल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांचे आरोग्य निकोप राहण्यास मोठी मदत होणार आहे. सुदृढ जनावरांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे मंत्री केदार म्हणाले.



या योजना राबवणार

  • कोरोना काळातही जिल्हा परिषदेने दुधाळ जनावरे, शेळी व गाई यांचे वाटप करुन ग्रामस्थांना आधार दिला.
  • या प्रकारचा पहिला प्रयोग नागपूर जिल्हा परिषदेद्वारे करण्यात आला आहे.
  • त्यातील काही त्रुटी दूर करुन हा प्रयोग राज्यभर करण्यात येणार आहे.
  • ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून ग्रामस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येवून बेरोजगारांना याद्वारे रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here



 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top