MHT-CET Exam : अर्ज नोंदणीसाठी 11 मे पर्यंत मुदतवाढ !

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) तंत्रशिक्षण विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याप्रमाणे ‘सीईटी’ परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ११ मे पर्यत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती सीईटी सेलने दिली आहे.

सीईटी सेलकडून यंदा सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा या ऑगस्टमध्ये जाहीर करण्यात येणार असल्याने या परीक्षांसाठी अर्ज भरण्याची मुदत द्यावी, अशी मागणी विद्यार्थी, पालकांमधून होत होती. दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित पाहता एमएचटी सीईटीसह एमबीए, एमसीए, एम. आर्किटेक्चर आणि पदव्युत्तर हॉटेल मॅनेजमेंट या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांना ११ मे पर्यंत तर उच्चशिक्षण पदवी अभ्यासक्रमांना २२ जूनपर्यंत तसेच उच्च शिक्षणातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना ७ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पालक विद्यार्थ्यांसाठी ही अंतिम मुदतवाढ असून यापुढे कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आतापर्यंत राज्यात होणारी १६ सीईटी अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामधील ९ लाख २६ हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे. मात्र अद्यापही १ लाख ५८ हजार ८५५ विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज पूर्ण भरले नसल्याची माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर दिली आहे.  राज्यातील बहुतांश विद्यापीठांच्या परीक्षा या १ ते १५ जुलै दरम्यान होण्याची शक्यता असल्याने दुसऱ्यांदा सीईटी सेलच्या वेळापत्रकात बदल करून सुधारित वेळापत्रक जाहीर केले = आहे. या पार्श्वभूमीवर आता ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण आहेत किंवा ज्यांनी अर्ज करण्याची संधी हुकली आहे अशा विद्यार्थ्यांना आणखी संधी – द्यावी, अशी मागणी होत होती.

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇

👉Join whatsapp group – Click her

👉JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top