FYJC Admission 2022 : अकरावीसाठी ३० मेपासून भरता येणार प्रत्यक्ष अर्ज

२७ मेपर्यंत डेमो अर्ज भरण्याची सुविधा

अकरावी प्रवेशाचा अर्ज भरण्याचा सराव करता यावा आणि प्रत्यक्ष अर्ज भरणे सुलभ व्हावे, यासाठी २३ ते २७ मे या कालावधीत अकरावी प्रवेशाच्या पोर्टलवर डेमो लॉगिन सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे. प्रत्यक्ष अर्ज भरण्याची कार्यवाही ३० मे रोजी सुरू होईल. त्यापूर्वी डेमो लॉगिनमध्ये भरलेली माहिती नष्ट करण्यात येईल. प्रत्यक्ष अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा नव्याने नोंदणी करून लॉगिन आयडी, पासवर्ड  जपून ठेवण्याबाबतीत जागरूकता करण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

मुंबई महानगर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर, अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील अकरावी प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने कार्यवाहीला याबाबतच्या शिक्षण | संचालनालयाकडून मान्यता देऊन सुरू करण्याची सूचना शिक्षण उपसंचालक कार्यालयांना देण्यात आली आहे. त्यास कार्यवाहीचे टप्पेही दिले असून, आपल्या स्तरावरून वेळापत्रकाप्रमाणे कार्यवाही सुरू करण्याची सूचना शिक्षण संचालक महेश पालकर यानी दिली आहे.

प्रत्यक्ष अर्ज नोंदणी व भाग- १ भरण्याचे वेळापत्रक

३० मे २०२२ पासून- १) ऑनलाइन अर्ज नोंदणी व प्रवेश अर्ज १ भरणे, अर्ज प्रमाणित करणे (ऑनलाइन अर्ज करून विद्यार्थ्यांनी लॉगिन आयडी व पासवर्ड मिळविणे, तसेच अकरावी प्रवेशाचा भाग १ भरणे, ऑनलाइन शुल्क भरणे, अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र निवडणे) T

विद्यार्थ्यांनी भरलेल्या माहितीचा अर्ज तपासून प्रमाणित करणे ३० मे २०२२ पासून ते राज्य मडळाच्या निकालापर्यंत ३) उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयानी आपली माहिती “तपासून अतिम करणे शिक्षण उपसंचालकानी ने शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती तपासून देणे * दहावीच्या निकालानंतर विद्याथ्र्यांनी अर्जाचा भाग-२ भरून प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयाची पसंतीक्रम नोंदविणे, तसेच कोटातर्गत राखीव जागावरील प्रवेशासाठी पसतीची महाविद्यालय निवडणे ऑनलाइन नमूद करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top