भरती अभ्यासक्रम

जिल्हा परिषद भरतीः स्वरूप व अभ्यासक्रम – District Council Recruitment : Format And Syllabus

जिल्हा परिषदेत 2019 मध्ये 5300 पदांची जाहिरात प्रकाशित झालेली होती. गेल्या चार वर्षांपासून रखडलेली 13521 पदांची भरती आणि सर्व जिल्हा परिषदांमधील रिक्त असलेल्या 46,932 पदांच्या भरती परीक्षा सुरु करण्याचे आदेश राज्य सरकारने संबंधित जिल्हा परिषदांना दिले आहेत. आता राज्य सरकारने जिल्हा परिषदेतील तब्बल 2019 मधील 5300 पदांची भरती जी. कोरोनामुळे प्रभावित झाली होती ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तत्काळ सुरु करावी, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे ही परीक्षा लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे. या भरती प्रक्रियेत आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, आयोग्य पर्यवेक्षक या पदांची परीक्षा सुरुवातीला आणि नंतर लिपीक, ग्रामसेवक, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, आरेखक, कनिष्ठ आरेखक, विस्तार अधिकारी (शिक्षण), सांख्यिकी लघुलेखक, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ यांत्रिकी पदांसाठी भरती परीक्षा घेण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.

District Council Recruitment : Format And Syllabus

स्वरूप :

जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या पदांसाठी होणारी परीक्षा 100 प्रश्नांची असून प्रत्येक प्रश्नाला 2 गुण याप्रमाणे 200 गुणांची राहील. ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची राहील. या परीक्षांना मुलाखत नसल्यामुळे ह्या पदांसाठी अंतिम निवड लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणानुसार असेल.

विषय प्रश्नांची संख्या गुण प्रश्नाचे स्वरूप
इंग्रजी व्याकरण 25 50 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
मराठी व्याकरण 25 50 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
सामान्य ज्ञान 25 50 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
अंकगणित व बुद्धिमत्ता 25 50 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
एकूण 100 200 वेळ : 90 मिनटे



अभ्यासक्रम :

1. सामान्यज्ञान : जगाचा भूगोल, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची वैशिष्ट्ये, भारताचा इतिहास (महाराष्ट्राशी संबंधित), भारतीय संविधान, पंचायतराज्य व्यवस्था, सामान्य विज्ञान, दिनविशेष, व्यक्तिविशेष, घडामोडी.  चालू घडामोडी

2. मराठी व्याकरण:  वर्णमाला व उच्चारस्थान, शब्दांच्या जाती (नाम, सर्वनाम विशेषण क्रियापद अव्यय). विभक्ती, समास, अलंकार, काळ, वाक्प्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी.

3. इंग्रजी व्याकरण: Parts of Speech, Pronoun, Adjective, Verb, Preposition, Conjunction, Articles, Sentence, Tense, Active-Passive Voice, Direct Indirect Speech, Synonyms & Antonyms, Idioms & Pharases.

4. अंकगणित : संख्याज्ञान, स्थानिक किंमत, गणिताच्या क्रिया, लसावी मसावी, अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, वर्ग, f वर्गमुळ, घन, घनमुळ, घातांक, सरासरी, → गुणोत्तर प्रमाण, शतमान, शेकडेवारी, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, काळ-काम, वेग-अंतर, क्षेत्रफळ, परिमिती

बुद्धिमत्ताः संख्यांचा क्रम, अक्षर शब्द संबंध, वर्तुळ, त्रिकोण, चौकोनातील संख्या ओळखणे, सांकेतिक शब्दरचना, आकृत्यांचे पृथक्करण, घनावरील प्रश्न, नाते-संबंध, दिशांवरील प्रश्न कालमापन, दिनदर्शिका.





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!