आरोग्य विभागात 10,000 पदांची भरती – Aarogya vibhagat 10000 padanchi bharti

Aarogya vibhagat 10000 padanchi bharti

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक, या संवर्गातील 10 हजार 127 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा निवड समितीमार्फत ही भरती करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी अलीकडेच दिली. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क सवगापैकी आरोग्य विभागाशी संबंधित पदांची भरती प्रक्रिया जिल्हास्तरावरच घेण्याबाबतची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना आदेश देण्यात आला आहे. पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च च्या जाहिरातीनुसार आलेल्या अर्जाांमधून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पाच संवर्गासाठी एकूण चार लाख अर्ज प्राप्त झाले असून त्या उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे.




‘ड’ वर्गाच्या पुन्हा परीक्षा, लवकरच तारखांची घोषणा : टोपे

पेपरफुटीमुळे चर्चेत आलेली आरोग्य भरती परीक्षा पुष येणार असून परीक्षेच्या तारखा पुढील आठवड्यात जाहीर करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्ली दाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असून परीक्षेचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य भरती संदर्भात विधानसभेत  पोलिसांना सखोल चौकशी करण्यासंदर्भात आदेश दिले होते. पोलिसांचा सविस्तर अंतिम अहवाल अत्यावश्यक आहे. ‘ड’ वर्गाचा पेपर पूर्ण व्हायरल झाला होता म्हणून आम्ही पुन्हा ‘ड‘ वर्गाची परीक्षा येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचाही निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यापुढे अशा घटना होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. तसेच पेपरफूटीच्या प्रकरणात कारवाई झालेल्या कुणाचीही गय केली जाणार नसून त्यांना कठोर शिक्षा केली जाईल, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇

👉Join whatsapp group – Click her

👉JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top