जॉबचे गणित बदलणार; मुंबई, दिल्ली, बेंगळुरू रोजगाराचे ठरणार केंद्र
येणाऱ्या दशकात देश आणि जगभरातील नोकरी क्षेत्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. ज्या क्षेत्रात सध्या नोकऱ्यांची संधी दिसत आहेत तेथे येणाऱ्या दिवसांत घट होऊ शकते. या नोकऱ्यांची जागा नवीन क्षेत्र घेणार असून, तेथे नोकरी उपलब्ध होईल.
कमी पगाराची नोकरी पुढील काळात संपणार असून, त्याची जागा तंत्रज्ञान घेऊ शकते. या तंत्रज्ञानाला चालवण्यासाठी नवीन क्षेत्र सुरू होऊ शकतात. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमपासून अमेरिकेच्या ब्युरो ऑफ लेवर स्टेटिक्ससह अनेक संस्थांनी ही शक्यता व्यक्त केली असल्याने नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे काळाची गरज बनली आहे.
यांच्या नोकऱ्या धोक्यात :
डेटा एन्ट्री ऑपरेटर क्लार्क,
अकाउंटेट कारखान्यातील कामगार,
मेकॅनिक, रिलेशनशिप मैनेजर, डोअर टू
डोअर सेल्स वर्कर प्रशिक्षण अधिकारी,
बांधकामाशी संबंधित कामगार
या नोकऱ्या वाढणार :
मार्केटिंग, साइट रिलाएबिलीटी इजिनिअर, मॉलिक्युलर
बायोलॉजिस्ट, वेलनेस
स्पेशालिस्ट दूझर एक्सपिरियन्स रिसर्चर, मशिन लर्निंग इंजिनिअर,
रिकूटमेट एसोसिएट डेटा सायन्स स्पेशालिस्ट, चिफ लीगल
ऑफिसर, ई बिझनेस मॅनेजर, बैंक एड डेव्हलपर, मीडिया बायर्स स्ट्रेटजी. एसोसिएट बिझनेस
डेव्हलपमेंट प्रतिनिधी सेवा विश्लेषक
उद्योग व संधीचे शहर :
मार्केटिंग, जाहिरात, इंटरनेट
नवी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू
आयटी सर्विस, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर
बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई
रुग्णालय आणि हेल्थ केअर
मुंबई, बेंगळूरू, चेन्नई
वेलनेस स्पेशालिस्ट
बेंगळुरू, मुंबई, नवी दिल्ली
आयटी सेवा, डिझाइन
नवी दिल्ली, मुंबई, बेंगळुल
आयटी, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर
बेंगळुरु, मुंबई
आरोग्य क्षेत्र सर्वात गतीने वाढणार :
■ येणार्या दशकभरात भारतात श्रमशक्तीमध्ये १४ टक्के वाढीचा अंदाज आहे. कृषी क्षेत्र सोडून अन्य क्षेत्रात वाढ पाहायला मिळेल..
■ सर्वात जास्त दशभरातील वाढ आरोग्य क्षेत्रात पाहायला मिळेल. त्यानंतर आर्ट मॅनेजमेंट आणि वेलनेस या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज मॅकेन्जी ग्लोबल इन्स्टिट्यूटने म्हटले आहे.
रिमोट वर्क कल्चरला मर्यादा :
■ आगामी दशकात होणाऱ्या बदलामध्ये रिमोट वर्क. (कल्चरमध्ये वाढ होईल. दिल्ली, मुंबई, बेंगळूरू, चेन्नई आणि हैदराबादमध्ये भाड्याने घेतलेली ऑफिसवी जागा कमी होत १.३७ कोटी वर्ग फूट झाली आहे.
■ मात्र या वर्क कल्चरचा उपयोग मर्यादित क्षेत्रासाठीच उपयोगी ठरू शकतो. कृषी आणि किरकोळ विक्री क्षेत्रात याचा वापर शक्य नाही.
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇