स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी महत्वाची बातमी – बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी ; पदभरती परीक्षा एमपीएससीमार्फत घ्या !

 राज्यसेवेच्या ब’ (अराजपत्रित), ‘क’ गट आणि ‘ड’ गटाच्या परीक्षायाखासगी कंपन्यांऐवजी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाद्वारेच (एमपीएससी) आयोजित करण्यात याव्यात, अशी मागणी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यांनी खासगी कंपन्यांमुळे परीक्षेच्या आयोजनात गैरप्रकार होत असल्याची उदाहरणे देत कडू यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांनाच या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

गेल्या वर्षभरात ज्या खासगी कंपन्यांनी स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले. त्या बहुतांश परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले. यामुळे खासगी कंपन्यांची विश्वासार्हता पूर्णपणे कमी झाली आहे. 

याऐवजी एमपीएससीकडूनच या परीक्षा घेतल्या, तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारोतरुणांना परीक्षांवर पुन्हा एकदा विश्वास बसेल. परीक्षा खासगी कंपन्याच आयोजित करीत राहिल्या, तर सातत्याने गैरप्रकारांची प्रकरणे समोर येतील. यामुळे सरकारने घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

विद्यार्थ्यांचीही मागणी : Demand of students also:

राज्यसेवेच्या सर्व प्रकारच्या परीक्षा या  एमपीएससीनेच आयोजित कराव्यात, अशी आग्रही मागणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी करीत आहेत. गेल्या वर्षी परीक्षांच्या आयोजनातून जे घोटाळे समोर आले ते दुर्दैवी आहेत. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून, यापुढेही असेच सुरू राहिले, तर असंख्य विद्यार्थ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल.

 
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇

👉Join whatsapp group – Click her

👉JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top