मोठी बातमी! 3 वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषद आरोग्य विभागातील भरती होणार सुरु, 5300 जणांना नोकरी मिळण्याची संधी – Aarogya Bharti Big Update

जिल्हा परिषदेने मार्च 2019 मध्ये आरोग्य विभागासाठी भरती जारी केलेली होती. पण कोरोना महामारीमुळे ती पुढे ढकलली गेली. दिलासादायक बाब म्हणजे राज्य शासनाने शासन निर्णय काढत 2019 ची भरती प्रक्रिया तत्काळ राबविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार 2019 मध्ये अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज भासणार नाही. भरती प्रक्रिया सुरु करण्याबाबत हलचाली दिसू लागल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.



कोणती पदे भरली जाणार

गेल्या तीन वर्षापासून रखडलेली जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील पदासाठी ही जाहिरात 2019 ला काढण्यात आली होती. मात्र गेल्या तीन वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे भरती रखडली होती. दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी राज्य शासनाने शासन निर्णय काढत 2019 ची भरती प्रक्रिया तत्काळ राबविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार 2019 मध्ये अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज भासणार नाही.

भरती प्रक्रिया सुरु करण्याबाबतच सकारात्मक चिन्ह दिसू लागल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. कोरोनामुळे आणि त्यानं वेगवेगळ्या वादांमुळे गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता आणि इतर संबंधित पदांची भरती रखडली होती. जाहिरात काढण्यात आल्यानंतरही ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्यानं विद्यार्थी निराश झाले होत. आता पुन्हा एकदा भरती प्रक्रिया तत्काळ सुरु करण्यात येण्याच्या हालचालींना वेग आलाय.

5300 जणांच्या भरतीचा मार्ग मोकळा…

जिल्हा परिषदेने मार्च 2019 मध्ये आरोग्य विभागासाठी भरती जारी केलेली होती. पण कोरोना महामारीमुळे ती पुढे ढकलली गेली. जिल्हा परिषदेमार्फत 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आता राज्य सरकारनं जारी केलेल्या निर्देशांनुसार 5300 जणांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालाय.

यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता अशी आहे…

औषध निर्माता – B.Pharm/D.Pharm ची पदवी असणे गरजेचे आहे. तसेच MS-Cff/CCC हे संगणकीय ज्ञान असणे गरजेचे आहे.

आरोग्य सेवक – 10वी उत्तीर्ण तसेच संगणकीय ज्ञान आवश्यक

• आरोग्य सेविका-सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद असणे आवश्यक.

• आरोग्य पर्यवेक्षक – आरोग्य कर्मचारी कोर्स पूर्ण असणे आवश्यक. 

• प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc फिजिक्स / केमिस्ट्री/बायोलॉजी/झूलॉजी/माइक्रोबायोलॉजी हे विषय घेऊन पदवीधर असणे आवश्यक.

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇

👉Join whatsapp group – Click her

👉JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top