महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम – Maharashtra Tlathi Bharti Abhyskram

महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम – Maharashtra Tlathi Bharti Abhyskram



विषय अभ्यासक्रम

1. मराठीः
  • समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी, वाक्प्रचार चे अर्थ व उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द.
 
 
2.English:
  • vocabulary Synoms & anytoms, proverbs, tense & kinds of tense, question tag, use proper form of verb, spot the error, verbal comprehension passage etc, Spelling, Sentence, structure, one word substitution, phrases.
3. चालू घडामोडीः
  • (Current Affairs) सामाजिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा, मनोरंजन,
4. सामान्य ज्ञान:
  • (General Knowledge) महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास, पंचायतराज व राज्यघटना, भारतीय संस्कृती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य, भारताच्या शेजारील देशांची माहिती.
5. बुद्धिमत्ता:
  • (Aptitude) अंकमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, . वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.
6. अंकगणित:
  • (Arithmetic) गणित – अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, चलन, मापनाची परिणामी, घड्याळ.





 

परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना : 

परिक्षेचे स्वरुप :
 
१) लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक ०२ गुण ठेवण्यात येतील.
 
२) तलाठी पदासाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांसाठी – शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र.प्रनि.म.१२१६/प्रक्र६५/१६/१३-अ. दि.१३/०६/२०१८ मधील तरतुदीनुसार तलाठी पदासाठी पदवी ही कमीत कमी अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. परंतु मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शांलात परीक्षेच्या (इयत्ता १२ वी ) च्या दर्जाच्या समान राहील व लेखी परिक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दीक चाचणी या विषयावरील प्रश्नाकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवून एकुण २०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
3)शासन निर्णय, महसूल वन विभाग क्र. प्रानिमं- २००९/प्र.क्र.३५६/ई-१०. दि.०१/०१/२०१० मधील तरतुदीनुसार व शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र.प्रनिम-२२१६/प्र.क्र.६५/१६/९३-अ दि.१३/०६/२०१८ मधील तरतुदीनुसार या पदांकरीता मौखिक परीक्षा (मुलाखती घेण्यात येणार नाहीत.
 
४) उमेदवारांची निवडसूची तयार करणेसाठी शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्र. एसआरव्ही १०९७/प्र.क्र.३१/९८/१६अ. दि.१६/३/१९९९ आणि शासन शुध्दीपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्र. संकीर्ण१११८/प्रक्र.३९/१६-अ. दि.१९/१२/२०१८ अन्वये कार्यवाही करण्यात येईल.
 
५) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र.प्रनिम-१२१६/प्रक्र६५/१६/१३-अ दि. १३/०६/२०१८ मधील तरतुदीनूसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकुण गुणांच्या किमान ४५ % गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
(६) परीक्षेचा निकाल (निवडसुची) तयार करतांना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र.प्रनिम १२१६/प्र.क्र.६५/१६/१३-अ. दि.१३/०६/२०१८ मध्ये नमुद निकषांच्या आधारे क्रमवार लावला जाईल.
 





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top