राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत मुलाखतीद्वारे भरती | NHM Recruitment 2022

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 05 मे 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/ 

एकूण जागा – 03

पदाचे नाव – ऑडिओलॉजिस्ट, प्रशिक्षक, कार्यक्रम सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता – BASLP/ Any Graduate with Typing Skill.


वयाची अट 

खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे

राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे


वेतन- 18000/- to 25000/

अर्ज शुल्क – 

खुल्या प्रवर्गासाठी – 150/-, 

राखीव प्रवर्गासाठी – 100/


नोकरीचे ठिकाण – नाशिक

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक,

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मे 2022 आहे.

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट- इथे क्लिक करा 


अटी व शर्ती:


१) इच्छुक उमेदवारांनी विहीत नमुन्यातील अर्ज ii) वयाचा पुरावा ३) पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षांचे प्रमाणपत्र ) ४) गुणपत्रिका ५) शासकीय/निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे कार्यालय प्रमुखाच्या स्वाक्षरी तथा नाव व मोबाईल क्र.सह ६ ) अनुभव संबंधितच असावा ७) जात / वैधता प्रमाणपत्र इ. छायांकित प्रतींसह दि. २५/०४/२०२२ ते दि. ०५/०५/२०२२ रोजी सायं ६:१५ वा. या कालावधीपर्यंत (शासकीय सुट्टी वगळून) राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक या पत्त्यावर पोप्टाद्वारे, कुरियर अथवा प्रत्यक्षात (By Hand) सादर करण्यात यावे.

२ ) सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांचे दिनांक २५ एप्रिल २०१६ चे शासन निर्णयास अनुसरुन अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे व कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय करीता ४३ वर्षे राहील. वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.) व विशेषज्ञ, अतिविशेषज्ञ यांची सेवा प्रवेश आणि सेवा समाप्तीची वयोमर्यादा ७० वर्ष राहील व अभियानातील इतर रुग्ण सेवेशी संबंधित पदांची (उदा परिचारिका, अधिपरिचारिका तंत्रज्ञ, समुपदेशक, औषधनिर्माता इ.) यांची सेवाप्रवेश व सेवासमात्पीची वयोमर्यादा ६५ वर्ष राहील. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सेवेतील कार्यरत उमेदवारांकरीता कमाल सेवा प्रवेश मर्यादा ५ वर्षापर्यंत शिथिल करण्यात येईल. ६० वर्षावरील अर्जदारांकरीता जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणित शारिरीक योग्यता (Physical Fitness) चे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. वय वर्ष ६० नंतर प्रत्येक वर्षी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडुन शारीरीकदृष्टा सक्षम असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झालेनंतरच पुर्ननियुक्ती आदेश देण्यात येईल.

३) शासकीय कर्मचारी यांच्या पूर्वीच्या शासकीय कर्मचारी कार्यकाळात कुठल्याही प्रकारचे गंभीर गुन्हयाची नोंद नसावी किंवा झालेली नसावी.

४) मुलाखतीकरीता उपस्थित उमेदवारांना प्रवासभत्ता अथवा इतर कुठलाही भत्ता देव राहणार नाही. तसेच एक कोरा लिफाफा ज्यावर रु.५/- टपाल तिकीट लावून अर्जासोबत जोडावा.

५) सदर भरतीची प्रक्रिया पूर्ण झालेनंतर भविष्यात जर एखाद्या ठिकाणी कर्मचारी यांनी राजीनामा दिलेमुळे जागा रिक्त झालेस प्रतिक्षा यादीवरील उमेदवारास नविन भरती प्रक्रिया न करता नियुक्ती आदेश दिले जातील.

६) खुल्या प्रवर्गातील पदाकरीता रु.१५०/- व राखिव प्रवर्गातील पदाकरीता रु.१००/- चा डिमांड ड्राप्ट जोडणे आवश्यक आहे व डिमांड ड्राफट च्या मागे स्वतःचे नाव स्वहस्ताक्षरात लिहावे, सदरचा डिमांड ड्राफट “District Integrated Health & Family Welfare Society Nashik- Non PIP” या नावे असावा. कोणत्याही कारणास्तव डिमांड ड्राफट बँकेत न वठल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

७) पदासमोर नमुद मानधन हे एकत्रित मानधन असुन त्याव्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही.

८) लहान कुटुंबाची अट दि.२३/०७/२०२० पासून लागु करण्यात आली असून दि.२३/०७/२०२० पासून दोनपेक्षा अधिक हयात मुले असणारे उमेदवार राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पदभरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार नाहीत,

९) वरील सर्व पदे कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधनाची असुन दि. २९/०६/२०२२ रोजी पर्यंतच्या कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत. पुढील पुर्ननियुक्ती (१ वर्षाच्या कालावधीकरीता) आपल्या कामगिरी मुल्यांकनावर आधारीत असेल.

१०) राज्यस्तरीय वेळोवेळीच्या सुचना अधिनस्त कार्यवाही करण्यात येईल.

११) प्राप्त झालेल्या अर्जावरुन Qualifying Exam मध्ये मिळालेले अंतिम वर्षाचे गुण + उच्च शैक्षणिक

अर्हता + शासकीय/निमशासकीय / राष्ट्रीय आरोग्य अभियान समकाजाचा अनुभव या बाबींचे गुणावरुन समितीद्वारे मेरीट लिस्ट तयार करण्यात येईल. सदर मेरीटलिस्ट शासनाच्या www.nrhm.maharashtra.gov.in. https:/Marogya.maharashtra.gov.in व www.zpnashik.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. उमेदवारांनी सदरबाबत आक्षेप असल्यास त्याच दिवशी आपले आक्षेप नोंदवावे. तद्नंतर प्राप्त आक्षेपांचा विचार करण्यात येणार नाही यांची नोंद घ्यावी. विहीत मुदतीत प्राप्त आक्षेपांचा विचार करून अंतिम मेरीटलिस्ट उपरोक्त शासकीय संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. 

१२) वरील नमूद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निब्बळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच यापदासाठी शासनाचे सेवा नियम लागू नाहीत. 

१३) केंद्र / राज्य शासनाने संबंधित पदे नामंजुर केल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पूर्वसूचना न देतातात्काळ समाप्त करण्यात येईल

 १४) अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द्को णतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.

 १५) अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही.

(१६) अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरू असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचूक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी. 

(१७) भरती प्रक्रिये दरम्यान ज्या ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देय राहणार नाही.

१८) अर्जाचा नमुना हा जाहिरातीसोबत प्रसिध्द करण्यात आलेला असून, सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.

१९.) उमेदवारांचा अर्ज अपूर्ण व अर्धवट भरलेला असल्याने नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदारी ही उमेदवारांची राहील याबाबत उमेदवारांना तकार करता येणार नाही.

(२०) निवड झालेल्या उमेदवारांना करारपत्रातील अटी मान्य करारनामा पदावर रुजू होताना सादर करावा लागेल. असल्याबाबत रु.१००/- पेपरवर

(२१) निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळाल्यापासून दिवसामध्ये नियुक्तीचे ठिकाणी होणे बंधनकारक राहील अन्यथा त्यांची नियुक्ती आदेश संपुष्टात आणून प्रतिक्षाधिन यादीतील पुढील उमेदवारी देण्यात येईल

(२२) भरती प्रक्रियेच संपूर्ण अधिकारी, पदे कमी-जास्त करणे, भरती प्रक्रिया रद्द करणे, अटी व शर्तीमध्ये बदल करणे, पदस्थापनेच्या ठिकाणामध्ये बदल करणे, इत्यादी सर्व अधिकार है या कार्यालयाचे असून निवड प्रकियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकारी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक यांनी राखून ठेवलेले आहेत. 

२३) कोविड-१९ साथ उद्रेक परिस्थितीस अनुसरून मास्क व सैनिटायझरचा वापर करावा व सामाजिक अंतराचे नियम पाळणे बंधनकारक आहे.

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी 

सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇

👉Join whatsapp group – Click her

👉JOIN TELEGRAM PAGE  –   Click Her

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top