महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाट रस्ते | Important Ghats in Maharashtra
✅ 1) राम घाट >> कोल्हापुर – सावंतवाडी
✅ 2) अंबोली घाट >> कोल्हापुर – सावंतवाडी
✅ 3) फोंडा घाट >> संगमेश्वर – कोल्हापुर
✅ 4) हनुमंते घाट >> कोल्हापुर – कुडाळ
✅ 5) करूळ घाट >> कोल्हापुर – विजयदुर्ग
✅ 6) बावडा घाट >> कोल्हापुर – खारेपाटण
✅ 7) आंबा घाट >> कोल्हापुर – रत्नागिरी
✅ 8) उत्तर तिवरा घाट >> सातारा – रत्नागिरी
✅ 9) कुंभार्ली घाट >> सातारा – रत्नागिरी
✅ 10) हातलोट घाट >> सातारा – रत्नागिरी
✅ 11) पार घाट >> सातारा – रत्नागिरी
✅ 12) केंळघरचा घाट >> सातारा – रत्नागिरी
✅ 13) पसरणीचा घाट >> सातारा – वाई
✅ 14) फिटस् जिराल्डाचा घाट >> महाबळेश्वर – अलिबाग
✅ 15) पांचगणी घाट >> पोलादपुर – वाई
✅ 16) बोरघाट >> पुणे – कुलाबा
✅ 17) खंडाळा घाट >> पुणे – पनवेल
✅ 18) कुसुर घाट >> पुणे – पनवेल
✅ 19) वरंधा घाट >> पुणे – महाड
✅ 20) रूपत्या घाट >> पुणे – महाड
✅ 21) भीमाशंकर घाट >> पुणे – महाड
✅ 22) कसारा घाट >> नाशिक – ठाणे
✅ 23) नाणे घाट >> अहमदनगर – मुंबई
✅ 24) थळ घाट >> नाशिक – ठाणे
✅ 25) माळशेज घाट >> ठाणे- पुणे
✅ 26) सारसा घाट >> सिरोंचा – चंद्रपुर
✅ 27) रणतोंडी घाट >> महाड – महाबळेश्वर
✅ 27) आंबेनळी घाट >> महाबळेश्वर – महाड (रायगड)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
महाराष्ट्रातील घाटांची माहिती
आंबोली घाट (Amboli Ghat) :
आंबोली घाट हा बेळगाव आणि सावंतवाडी या
ठिकाणांना जोडतो. या घाटाला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. अनेक पर्यटक इथे धबधबे, जंगल आणि नैसर्गिकदृष्टया लाभलेला परिसर पाहण्यास येतात. या संपूर्ण घाट रस्त्याची लांबी एकूण ३० किमी आहे. महाराष्ट्रातील पर्यटकांना गोव्याला जाण्यासाठी या आंबोली घाटाचा वापर करून जावे लागते. हा SH-121 रस्ता असून या घाटाची समुद्रसपाटीपासून उंची २२६३ फूट आहे.
आंबा घाट (Amba Ghat) :
हा घाट महाराष्ट्रातील प्रसिद्ध घाट आहे. हा कोल्हापूर व रत्नागिरी ह्या प्रमुख शहरांना जोडणारा घाटरस्ता आहे. हा घाट कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी मधे येतो. आंबा घाटाची समुद्रसपाटीपासूनची ऊंची २००० फूट आहे. या घाटाच्या परिसरात विशाळगड आणि पावनखिंड आहे. ज्यांना शिवकालीन इतिहास लाभलेला आहे.
कुंभार्ली घाट (Kumbharli Ghat) :
कुंभार्ली घाट हा सातारा जिल्ह्यातील कराड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या शहरांना जोडतो. या घाटाची समुद्रसपाटीपासून उंची २०५१ फूट आहे. या संपूर्ण घाट रस्त्याची लांबी एकूण १४ किमी आहे. पावसाळ्यात या घाटात फेसळणाऱ्या दुधासारखे पाणी धबधबे, हिरवीगार झाडे, रिमझिम पाउस हे दृश्य मन लोभवणारे असते.
माळशेज घाट (Malshej Ghat) :
पावसाळ्यात दाट धुक्याची शाल पांघरलेला, थंड हवेची अनुभूती देणारा आणि खलखळत्या पाण्याच्या धबधब्यानी वेढलेला असा हा माळशेज घाट.
माळशेज घाट हा मुंबई व नाशिक या प्रमुख शहरांना जोडतो. या घाटात जैवविविधतेचे दर्शन घडते म्हणजेच प्राणी पक्षी व झाडे आढळतात. हा घाट रस्ता SH-222 राज्य महामार्ग असून
आंबनेळी घाट (Ambenali Ghat) :
आंबनेळी घाट हा सातारा जिल्ह्यातील महाबळे आणि रायगड जिल्ह्यातील पोलादपूर या ठिकाणांना जोडतो. या घाटाची समुद्रसपाटीपासून उंची २०५१ फूट आहे. हा SH-72 रस्ता असून आंबनेळी घाट हा महाराष्ट्रातील सर्वात लांब व जीवघेणा घाट रस्ता आहे. या संपूर्ण घाट रस्त्याची लांबी एकूण ४० किमी आहे. या घाटामध्ये या आधी अनेक अपघात झाले आहेत. या घाटाच्या परिसरात प्रतापगड आहे जिथे शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता.