गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. यावर्षीच्या अर्थसंकल्पात 802 कोटींच्या तरतूदीसह पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी एकूण 1 हजार 29 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पोलीस दलात 7 हजार 231 पदांची भरती करण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या 119 व्या सत्राच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथक) संजय कुमार उपस्थित होते.
पवार म्हणाले, पोलीस दलात 7 हजार 231 पदांची भरती करण्यात येणार असून शिपाई पदावर भरती झालेला कर्मचारी 30 वर्षानंतर निवृत्त होताना खात्रीने सब इन्स्पेक्टर होईल अशा पद्धतीने कालबद्ध पदोन्नतीची रचना करण्यात आली आहे. तसेच राज्यातील जुन्या पोलीस स्टेशनच्या इमारतींचे दुरूस्ती व नुतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यातील ८७ पोलीस स्टेशनच्या बांधकामांना सुरूवातही झाली आहे. महिला पोलिसांच्या दैनंदिन कर्तव्याची वेळ आठ तासांची करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काळात राज्यात पोलिसांसाठी १ लाख घरं निर्माण केली जाणार आहेत.
पोलीस दलासाठीचे महत्त्वाचे निर्णय :
- पोलीस दलात 7 हजार 231 पदांची भरती –
- शिपाई पदावरील कर्मचारी निवृत्त होताना खात्रीने सब इन्स्पेक्टर होईल.
- राज्यात 87 पोलीस स्टेशनच्या बांधकामांना सुरुवात
- महिला पोलिसांना आठ तासांची ड्यूटीचा निर्णय लागू
- राज्य पोलिसांसाठी 1 लाख घरं बांधण्याचा निर्णय
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇