एसटीत मोठ्या प्रमाणात कंत्राटी चालकांची भरती | MSRTC Bharti 2022

 राज्यात कंत्राटी चालकांची भरती सुरू!! MSRTC Bharti 2022

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. पाच महिन्यानंतरही अद्यापही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून, कामावर परतले नाहीत. त्यामुळे एसटी पूर्ण क्षमतेने | धावत नसून, राज्यात कंत्राटी चालकांची भरती सुरू आहे. याचाच भाग म्हणून सोलापूर विभागातही ६७ कंत्राटी चालकांची नियुक्ती केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. सरकारने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल दिल्यानंतर संपातील कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत कामावर रुजू होण्याचे आवाहन करून देखील कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत.

• असे असताना राज्यात पंचवीस ते तीस टक्के कर्मचारी कामावर न आल्यास एसटीची सेवा अद्यापही थांबली आहे. 

•त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून, विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. 

•त्यामुळे संपावर तोडगा काढण्यासाठी आणि एसटीच्या फेऱ्या सुरू होण्यासाठी कंत्राटी चालकांची नियुक्ती

•करण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर विभागात एकूण ८० चालकांची भरती केली जाणार असून, यातील सध्या ६७ चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

• यातून २६० बस धावत असून दररोज ४० लाखांचे उत्पन्न मिळत आहे.

• निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला एक महिन्यासाठी नियुक्ती देण्यात येणार

दररोज ८४ हजार किलोमीटरचा प्रवास

गेल्या आठवड्यात निलंबित आणि संपावर गेल्यानंतर कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याच्या परिवहन मंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महामंडळ प्रशासनाने बाहेरगावी जाणाऱ्या बसेसच्या संख्येत वाढ केली आहे. सध्या दररोज ८४ हजार किलोमीटरचा प्रवास केला जात आहे. त्याचबरोबर खासगी वाहतूकदारांचीही भरती होणार असून त्यांची संख्याही वाढणार आहे.

महामंडळाकडून कंत्राटी चालकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून, ६७ चालकांची निवड करण्यात आली आहे.. यातून एसटीच्या फेन्या आणि उत्पन्न वाढणार आहे

– सुरेश लोणकर, विभागीय वाहतूक अधिकारी, सोलापूर

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची शासनात विलीनीकरणाची शक्यता संपुष्टात आली आहे. यानंतर संपाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधीमंडळात केलेल्या निवेदनानुसार, सेवा समाप्त झालेल्या २०१९ कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती दिली जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बडतर्फ करण्यात आलेल्या १०,२७५ कर्मचाऱ्यांना शिस्त व आवेदन पद्धतीनुसार कार्यवाही करून कामावर घेतले जाणार आहे. एसटी संपला पाच महिने उलटत आहेत. अजूनही ५०,३७५ कर्मचारी संपत सहभागी आहेत. काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत, तर २० हजारांहून अधिक कर्मचारी विविध कारवाईत अडकेल आहेत. बदली, बडतर्फी, निलंबन, सेवा समाप्ती अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.

विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या कामबंद आंदोलनाला चार महिने उलटल्यानंतरही, अनेक कर्मचारी अद्यापही आपल्या मागणीवर ठाम राहून कामावर परतलेले नाहीत. त्यामुळे महामंडळाने पूर्ण क्षमतेने सेवा सुरु करण्यासाठी राज्यभरात कंत्राटी चालकांची भरती प्रक्रिया सुरु केली असून, जळगाव विभागातही २३ मार्चपासून ९५ कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवायला सुरुवात झाली आहे.

खुशखबर – ST महामंडळात कंत्राटी चालक भरती. 11 हजार कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी लवकरच खासगी संस्थेला ठेका देण्यात येणार. एसटी महामंडळाने मोठे पाऊल उचलले असून 11 हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये वाहकांबरोबरच चालकांचीही संख्या मोठी असल्याने वाहतुकीचे वेळापत्रक अद्याप विस्कळीतच आहे. ते सुरळीत करण्यासाठी एसटीने मोठे पाऊल उचलले असून ११ हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. चालकांची भरती करण्यासाठी मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थेच्या नियुक्तीसाठी येत्या आठवडय़ात निविदा काढण्यात येईल आणि त्यानंतर साधारण १५ ते २० दिवसांत टप्प्याटप्याने कंत्राटी चालकांची भरती करण्यात येईल, अशी माहिती एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सातारा विभागीय कार्यालयाच्या वतीने 50 कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळ प्रशासनाने दिली आहे.

महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱयांनी विविध मागण्यांसाठी मागील तीन महिन्यांपासून संप पुकारला आहे. ऐन दिवाळीत संप सुरू झाल्याने अनेक चाकरमान्यांचे हाल झाले होते. कर्मचारी संघटना व परिवहनमंत्र्यांनी तीन बैठका घेऊन सुमारे 41 टक्के पगारवाढ केली. तरीदेखील कर्मचाऱयांनी विलीनीकरण या मुद्यावर ठाम राहात संप सुरूच ठेवला. त्यानंतर महामंडळ प्रशासनाने कामावर हजर न होणाऱया कर्मचाऱयांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांचे निलंबन केले. या कारवाईमुळे आगारांतील 50 टक्क्यांहून अधिक कर्मचारी कामावर हजर झाले. त्यामुळे सलग दोन महिने बंद असलेली वाहतूक काहीअंशी पूर्वपदावर येऊ लागली आहे.

जिह्यातील आगारांतून अद्यापही पूर्ण क्षमतेने फेरया सुरू नाहीत. त्यामुळे कंत्राटी चालकांची भरती केली जाणार आहे. याबाबत कंत्राटी कर्मचाऱयांच्या ठेकेदारांशी चर्चा झाली असून, लवकरच कर्मचारी देण्याची मागणी केली आहे. जेणेकरून जिह्यात फेऱयांची संख्या वाढून प्रवाशांची गैरसोय दूर केली जाणार आहे, असे वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड यांनी सांगितले.

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top