मुंबई पोलीस निवड यादीतील विद्यार्थ्यांना महत्वाची सूचना |शासनाचे पत्र जाहीर

 मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी येताना कोणकोणत्या पडताळनी कराव्यात ?

उमेदवारांची वैद्यकिय तपासणी.  

चारित्र पडताळनी.  

पात्र ठरलेल्या सोबतच्या यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळनी कराव्यात. 

: नियुक्तीसाठी येताना कागदपत्र पडताळणीकरिता खालील नमूद प्रमाणपत्र न चुकता सोबत आणणे आवश्यक आहे 

१) भरती ओळखपत्र ( मैदानी चाचणी /लेखी परिक्षेचे )

२) भरती प्रक्रियेसाठी यापूर्वी जमा न केलेले सर्व मुळ कागदपत्र उदा. शैक्षणिक /डोमीसाईल /जातप्रमाणपत्र / नॉन क्रिमीलेअर / होमगार्ड / प्रकल्पग्रस्त / धरणग्रस्त इत्यादि संबंधित मुळ प्रमाणपत्र.

३) ०४ पासपोर्ट साईज फोटो,

४) आधार कार्ड व पॅन कार्ड

५) दैनंदिन गरजेच्या वस्तू घेवून पोलीस प्रशिक्षणाच्या तयारीने न चुकता हजर रहावे.

सोबत नियमीत वापरण्यास लागणारे कपडे, विश्रांती करिता साहित्य (दरी, मच्छरदाणी, पांघरूण), ताट-वाटी, तांब्या, ग्लास, दाढीचे साहित्य (पुरूषांकरिता), २ खाकी हाफ पॅन्ट, २ पांढऱ्या बनियान, कॅनव्हास शुज (१ जोडी), खाकी नायलॉन सॉक्स (२ जोडी), २०० पानी वह्या (२), १ पेन, गांधी टोपी, १ लोखंडी बकेट, महिलांकरिता २ ट्राऊझर, २ पांढरे टी-शर्ट, इत्यादी साहित्य सोबत आणावे. सोबत ‘मेस अॅडव्हान्स’ रू.२०००/- घेवून यावे. तसेच संपर्कासाठी दिलेला मोबाईल क्रमांक व ई मेल आयडी अद्ययावत ठेवावा. उमेदवाराने आपल्यासोबत चैनीच्या वस्तू किंवा किंमती वस्तू उदा. सोन्याचे दागिने इत्यादी वस्तू आणू नयेत. अशा वस्तू हरविल्यास किंवा चोरीला गेल्यास कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.

विशेष सूचना:

१) भरती ओळखपत्र नसल्यास अथवा अपूर्ण कागदपत्रे/प्रमाणपत्रे असल्यास नियुक्ती देण्यात येणार नाही. नियुक्तीसाठी दिलेल्या दिनांकाच्यावेळी गैरहजर राहिल्यास पूर्व सूचना न देता निवड रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी व न चुकता हजर रहावे. सदरची पोलीस शिपाई पदाची अस्थायी नियुक्ती ही नियुक्ती आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन आहे व सदरहू अटी व शर्ती उमेदवारांस बंधनकारक आहेत.

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top