परभणी : राज्याच्या वित्त विभागाने ४ मे २०२० रोजी घेतलेल्या निर्णयानुसार नवीन पदभरतीवर निर्बंध असल्याने • तूर्तास गट क व गट ड संवर्गातील कोणतीही नवीन पदभरती करता येणार नाही. त्यामुळे परभणी येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील संबंधित पदेही भरता येणार नाहीत, असे लेखी उत्तर कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले आहे.
परभणी येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात नवीन आकृतीबंधानुसार वर्ग १ ते ४ ची ६४० पदे मंजूर असताना त्यापैकी ४३४ पदे भरली असून, २०६ पदे रिक्त आहेत, हे सत्य आहे का? अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश |चव्हाण यांनी विधी मंडळाच्या अधिवेशनात विधान परिषदेत एका प्रश्नाद्वारे केली होती. रिक्त पदांमुळे
कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामांचा ताण येत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविण्यात अडचणी येत असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे. या प्रश्नावर कृषिमंत्री दादा भुसे यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की, परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या अधीनस्त गट अ ते गट ड संवर्गात एकूण ६४२ पदे मंजूर असून, सद्यस्थितीत त्यातील ४८९ पदे भरलेली • आहेत, तर १५३ पदे रिक्त आहेत. वित्त विभागाने ४ मे २०२० रोजी काढलेल्या आदेशानुसार नवीन पदभरतीवर निबंध असल्याने तुर्तास गट क व गट ड संवर्गातील कोणतीही नवीन पदभरती करता येणार नाही, असेही या उत्तरात न कृषिमंत्री भुसे यांनी म्हटले आहे.
कृषी अधिकाऱ्यांच्या पदासाठी लोकसेवा आयोगाला दिले पत्र
■ ४८९ पैकी ४१९ पदे तांत्रिक संवर्गाची असून, त्यापैकी ३८० पदे भरलेली आहेत. तालुका कृषी अधिकाऱ्यांसह एकूण ३९ पदे रिक्त आहेत. | तांत्रिक संवर्गातील रिक्त पदांचे प्रमाणे ९ टक्के आहे. १८ जानेवारी रोजी पदोन्नतीने ७ अधिकाऱ्यांना परभणी जिल्ह्यात पदस्थापना देण्यात आली आहे. ■ महाराष्ट्र कृषी सेवा संवर्गातील एकूण २०३ पदांचे | मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठविण्यात आले असून, आयोगाने या अनुषंगाने १८ जानेवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ■ या पदांकरिता उमेदवारांची शिफारस प्राप्त झाल्यास परभणी जिल्ह्यातील संबंधित रिक्त पदे प्राधान्य क्रमाने भरण्यात येतील, असे भूसे म्हणाले.
मंजूर पदे :- ६४२
भरलेली पदे :- ४८९
रिक्त पदे :- १५३
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here