Mahaforest Bharti 2023 – Important Information

निवडीची पध्दत :-

ऑनलाइन पध्दतीने सादर केलेल्या अर्जातील माहितीनुसार पात्र ठरणा-या उमेदवारांची महसूल व वनविभाग, शासन निर्णय क्रमांक एफएसटी-०६/२२/प्र.क्र.१२८/फ-४, दिनांक २७/१२/२०२२ व शासनाचे अनुषंगिक दिशानिर्देशानुसार निवड करण्यात येईल. निवडीबाबत टप्पे यासोबत परिशिष्ट-२ म्हणून जोडले आहे.लेखी परीक्षा :-

ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची, २०० गुणांची (एकूण १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) स्पर्धात्मक लेखी परिक्षा टि.सी.एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येईल.

विषय- गुण
मराठी- ५०
इंग्रजी -५०
सामान्य ज्ञान – ५०
बौधिक चाचणी – ५०

परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
परीक्षा ही २ तासाची राहील.
उमेदवाराने लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार गुणवत्तेनुसार लेखापाल पदाकरीता पात्र राहतील. ४५% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.

लेखी परीक्षेचा निकाल :–

वनवृत्तनिहाय लेखी परीक्षेचा निकाल चे वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल. उमेदवाराने ज्या वनवृत्तासाठी अर्ज केला आहे त्याच वनवृत्तासाठी त्याचा विचार करण्यात येईल.कागदपत्र तपासणी :-

लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणा-या उमेदवारांची प्रादेशिक निवड समितीच्या सूचनेनुसार कागदपत्राची तपासणी करण्यात येईल. कागदपत्र तपासणीच्या वेळेस उमेदवारांना लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील (सोबत जोडलेल्या परिशिष्ट-३ प्रमाणे). जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहतील ते भरती प्रक्रियेतून बाद ठरतील.

निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करणे :- लेखी परीक्षेत प्राप्त गुणांच्या गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व त्या आधारे सामाजिक / समांतर आरक्षण विचारात घेऊन रिक्त पदांच्या अनुषंगाने वनवृत्तवार निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येऊन ती www. ———–या वेबसाईटवर वर प्रसिध्द करण्यात येईल. निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करताना सामान्य प्रशासनविभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ, दिनांक ४/५/२०२२ मधील परिच्छेद १० मधील दरबनीनुसार करण्यात येईलerror: Content is protected !!
Scroll to Top