EWS Certificate Document List: या पोस्टमध्ये, महाराष्ट्र राज्याचे EWS प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ते पाहणार आहोत.
ओळखीचा पुरावा (खालीलपैकी कोणताही एक) :
- मतदार ओळखपत्र
- आधार कार्ड
- पारपत्र
- वाहन चालन अनुज्ञप्ती
- शासकीय निमशासकीय ओळखपत्र
- पॅन कार्ड
- गरा रोहयो जॉब कार्ड
पत्त्यासाठी पुरावा (खालीलपैकी कोणताही एक) :
- मतदार यादीचा पुरावा
- पाणीपट्टी, घरपट्टी पावती
- ७/१२ आणि ८-अ चा उतारा
- चीज देवक
- दुरध्वनी देयक
- पारपत्र
- आधारकार्ड
बाहेरील राज्यातून स्थलांतरित होऊन राज्यात स्थायिक झालेल्या व्यक्तींसाठी सादर करावयाचे पुरावे (खालीलपैकी कोणतेही दोन):
- शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
- वीज देवक
- भाडे करार / भाडे पावती
- दुधनी देवक
- चाहन चालन अनुज्ञप्ती
- शासकीय कर भरणा केलेला अथवा नगरपालिका, महानगरपालिका ग्रामपंचायत यांच्याकडे कोणतीही फी अथवा कर भरणा केलेली पावती
वयाचा पुरावा :
जन्मदाखला किंवा जन्मतारीख असलेले शालान्त परीक्षा प्रमाणपत्र यापैकी एक. ते नसल्यास खालीलपैकी एक
- प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा
- बोनाफाईड प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
उत्पन्नाचा पुरावा (खालीलपैकी जे लागू असतील ते सर्व )
- कुटुंबातील ज्या व्यक्ती शासकीय अथवा खाजगी नोकरीत असल्यास त्यांचे वेतनाचे फॉर्म १६
- व्यवसाय धंदा असल्यास वार्षिक आयकर, वस्तू व सेवाकर भरल्याचे पुरावे
- अर्जदार अथवा कुटुंबातील सदस्य जमीनमालक असल्यास त्यांचे ७/१२, ८-अ चा उतारा व तलाठी अहवाल
- कुटुंबातील सदस्य सेवानिवृत्त असल्यास त्यांचे बँकेकडील प्रमाणपत्र, आयकर विवरणपत्र
- अन्य मार्गातून (गुंतवणूक, लाभांश इ. मार्गांनी उत्पन्न असल्यास त्याची विगतवारी पुराच्यासह
टीप वरील पुराव्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यास शंका असल्यास त्याच्या पडताळणीसाठी आवश्यक बाबींची पूर्तता करणेबाबत विचारणा करू शकेल.