Akola Nagar Parishad Bharti 2026: जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला (नगर परिषद प्रशासन विभाग) अंतर्गत अकोला जिल्ह्यातील अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, तेल्हारा, हिवरखेड, पातूर नगर परिषदा व बार्शीटाकळी नगर पंचायतच्या आस्थापनेवरील गट-क आणि गट-ड संवर्गातील एकूण १०३ रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून २६ नोव्हेंबर २०२६ ते १७ डिसेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची संपूर्ण माहिती, पदांचा तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची लिंक खालीलप्रमाणे दिली आहे.
Akola Nagar Parishad Bharti 2026
एकूण जागा : १०३
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
| अ.क्र. | पदाचे नाव | रिक्त पद संख्या |
| १ | कनिष्ठ लिपिक / लिपिक टंकलेखक (Junior Clerk / Clerk-Typist) | १३ |
| २ | लघु टंकलेखक (Stenographer) | ०१ |
| ३ | वाहन चालक (Driver) | ०५ |
| ४ | उद्यान पर्यवेक्षक (Garden Supervisor) | ०२ |
| ५ | सहाय्यक ग्रंथपाल (Assistant Librarian) | ०२ |
| ६ | गाळणी चालक (Filter Operator) | ०५ |
| ७ | जोडारी (Fitter) | ०६ |
| ८ | वीजतंत्री (Electrician) | ०४ |
| ९ | पंप ऑपरेटर / पंप चालक (Pump Operator) | ०८ |
| १० | तारतंत्री (Wireman) | ०४ |
| ११ | वाहन चालक कम ऑपरेटर (Driver-cum-Operator) | ०५ |
| १२ | अग्निशामक विमोचक (Fireman Rescuer) | २२ |
| १३ | शिपाई (Peon) | २४ |
| १४ | व्हालमन (Valveman) | ०२ |
| एकूण रिक्त पदे | १०३ |
शैक्षणिक पात्रता | Educational Qualification :
-
कनिष्ठ लिपिक / लिपिक टंकलेखक: मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी + राज्य शासनाचे मराठी ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. टंकलेखन प्रमाणपत्र.
-
लघुटंकलेखक: कोणत्याही शाखेची पदवी + लघुलेखन परीक्षा (मराठी ८० श.प्र.मि. व इंग्रजी ८० श.प्र.मि.) + टंकलेखन परीक्षा (मराठी ३० व इंग्रजी ४० श.प्र.मि.) उत्तीर्ण.
-
वाहन चालक: १० वी (S.S.C.) उत्तीर्ण + वैध हलके वाहन (LMV) चालविण्याचा परवाना आवश्यक.
-
उद्यान पर्यवेक्षक: कृषी विद्यापीठाची B.Sc. (Horticulture / Agriculture / Forestry) किंवा B.Sc. (Botany) पदवी.
-
सहाय्यक ग्रंथपाल: ग्रंथालय शास्त्र शाखेची B.Lib. पदवी (M.Lib. धारकांना प्राधान्य).
-
गाळणी चालक: विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र (Chemistry) विषयातील पदवीधर.
-
जोडारी (Fitter): १० वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र.
-
वीजतंत्री (Electrician): १० वी उत्तीर्ण + वीजतंत्री ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र.
-
पंप ऑपरेटर: १० वी उत्तीर्ण + पंप ऑपरेटर ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र.
-
तारतंत्री (Wireman): १० वी उत्तीर्ण + तारतंत्री (वायरमन) ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र.
-
वाहन चालक कम ऑपरेटर: १० वी उत्तीर्ण + ६ महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स किंवा MSBTE चा २ वर्षांचा अग्निशमन कोर्स + वैध जड वाहन (HMV) परवाना व शारीरिक पात्रता.
-
अग्निशामक विमोचक (Fireman): १० वी उत्तीर्ण + ६ महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स किंवा MSBTE चा २ वर्षांचा अग्निशमन कोर्स + शारीरिक पात्रता (उंची: पुरुष १६५ से.मी., महिला १५७ से.मी.; छाती: ८१-८६ से.मी.).
-
शिपाई (Peon): १० वी (S.S.C.) उत्तीर्ण.
-
व्हालमन (Valveman): १० वी उत्तीर्ण + प्लंबर (Plumber) ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र.
वयोमर्यादा | Age Limit as on 26/11/2026 :
वयाची गणना २६ नोव्हेंबर २०२६ रोजी केली जाईल:
-
अग्निशामक विमोचक व वाहन चालक कम ऑपरेटर ही पदे वगळून उर्वरित १२ पदांसाठी:
-
किमान वय: १८ वर्षे
-
कमाल वय (खुला प्रवर्ग): ३८ वर्षे
-
कमाल वय (मागासवर्गीय व EWS): ४३ वर्षे
-
-
अग्निशामक विमोचक व वाहन चालक कम ऑपरेटर पदांसाठी:
-
किमान वय: १८ वर्षे
-
कमाल वय (खुला प्रवर्ग): ३० वर्षे
-
कमाल वय (मागासवर्गीय व EWS): ३३ वर्षे
-
-
दिव्यांग व पदवीधर अंशकालीन उमेदवार: नियमानुसार कमाल ४५ वर्षांपर्यंत सवलत लागू राहील.
परीक्षा फी | Application Fee :
-
खुला प्रवर्ग (Open): रु. १,०००/-
-
राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व EWS): रु. ९००/-
-
माजी सैनिक (Ex-Servicemen): परीक्षा शुल्क नाही (निःशुल्क).
महत्त्वाच्या तारखा | Important Dates :
-
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: २६ नोव्हेंबर २०२६
-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ डिसेंबर २०२६
-
परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख: १७ डिसेंबर २०२६
महत्वाच्या लिंक | Important Link :
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) |
येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा