VANATI Admit Card 2026

वनार्टी Admit Card 2026 जाहीर; प्रवेशपत्र असे करा डाउनलोड

VANARTI Admit Card 2026: महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी), नागपूर यांच्यामार्फत सन 2026-27 या आर्थिक वर्षात विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याबाबत अधिकृत सूचना वनार्टीने 8 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध केली आहे.




कोणत्या परीक्षांसाठी प्रशिक्षण?

वनार्टीमार्फत खालील स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे:

  • IBPS Banking
  • LIC / AAO
  • रेल्वे भरती (RRB)
  • मिलिटरी / पोलीस भरती
  • कर्मचारी निवड आयोग (SSC-CGL)
  • शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)
  • MBA-CAT
  • CMAT
  • CET

या विविध परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी चाळणी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

VANARTI चाळणी परीक्षा 2026 कधी?

अधिकृत परिपत्रकानुसार चाळणी परीक्षा 11 ऑगस्ट 2026 ते 12 ऑगस्ट 2026 या कालावधीत नियोजित करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून ठेवणे महत्त्वाचे आहे.




VANARTI Admit Card 2026 कसे डाउनलोड करावे?

वनार्टीच्या अधिकृत सूचनेनुसार प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील प्रक्रिया करा:

1. परिपत्रकासोबत प्रसिद्ध करण्यात आलेली प्रवेशपत्राची लिंक उघडा.

2. अर्ज करताना सादर केलेला आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाका.

3. त्यानंतर “Log In” बटनावर क्लिक करा.

4. लॉगिन केल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या “Download Admit Card” या बटनावर क्लिक करा.

5. त्यानंतर आपले प्रवेशपत्र डाउनलोड करा.

Admit Card डाउनलोड करताना अडचण आल्यास

प्रवेशपत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास वनार्टी कार्यालयाच्या कॉल सेंटरशी खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याची सूचना देण्यात आली आहे:

  • 7887882026
  • 8975215704
  • 8669842312
  • 7744919069

हे संपर्क क्रमांक अधिकृत परिपत्रकात दिलेले आहेत.




महत्वाच्या लिंक

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top