Free Mobile Shop On eVehicle Scheme

Free Mobile Shop On eVehicle Scheme: दिव्यांग व्यक्तींना मिळणार फिरत्या वाहनांवरील दुकानांसाठी ३.७५ लाख!! अर्ज सुरु

Free Mobile Shop On eVehicle Scheme: दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) उपलब्ध करुन देण्याचा निर्णय संदर्भक्र. १ वरील दिनांक १०.६.२०१९ च्या शासन निर्णयानुसार घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी व्यक्तींना फिरत्या वाहनावरील दुकानासाठी रुपये ३.७५ लाख कमाल अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दिव्याग लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी परि. ४ नुसार निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये व्यवस्थापक, दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, विभागीय कार्यालय, नागपूर यांना सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तथापि, सदर कार्यालय दिनांक २७.८.२०१८ पासून बंद करण्यात आले असल्याने समितीची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. समितीच्या रचनेमध्ये बदल करणे तसेच लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी अटी शर्तीमध्ये बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.




Mobile Shop On eVehicle Scheme:

योजनेच्या अटी व शर्ती

  • अर्जदार हा शासकीय/निमशासकीय/मंडळे/महामंडळे यांचा कर्मचारी नसावा,
  • या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास मंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२३०९२७१५५९४०१२३५ असा आहे. हे शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.




👇अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇

https://register.mshfdc.co.in/apply

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top