ARTI Training Registration: अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश असणाऱ्या मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय असा सर्वांगीण विकास होण्यासाठी व अनूसूचित जातीविषयक कल्याणकारी धोरणाचा मातंग समाजाच्या व्यक्तींना योग्य प्रमाणात लाभ पोहोचण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी (ARTI Training Registration) नोंदणी करावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 31 जानेवारी 2025 पर्यंत आहे. युवकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात अर्ज केल्यामुळे तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. त्यावर तांत्रिक विभागाने गुगल फार्म ऐवजी आर्टीच्या संकेतस्थळावर उमेदवारांना (ARTI Training Registration) नोंदणीसाठी नवीन अर्ज उपलब्ध करून दिला आहे. उमेदवारांनी याठिकाणी नोंदणी केल्यानंतर कोशल्य प्रशिक्षणानुसार त्यांच्या अर्जाची छाननी करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षण कोर्स लाभ मिळणार आहे
स्पर्धा परीक्षाः युपीएससी, एमपीएससी, रेल्वे, जेईई- नीट, पुजीसी नेट सेट, बैंक (आयबीपीएस), पोलीस मितीटरी कौशल्य विकास परदेशात नोकरीसाठी लागणारे विविध कोशल्य प्रशिक्षण व परदेशी उच्च शिक्षणाची संधी, शेतीपूरक विविध व्यवसाय प्रशिक्षण हाजिर व सॉफ्टवेअर तसेच कॉम्प्युटर सर्टिफिकेट संदर्भातील विविध कोर्सेसचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
अशी करा नोंदणी :
इच्छुक उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी https://arti.org.in या आर्टीच्या संकेतस्थळावर करिअर हा पर्याय निवडावा आणि ऑनलाईन (ARTI Training
Registration) नोंदणी करावी. किंवा या लिंकवर क्लिक करुन https://arti.org.in/arti-job ऑनलाईन अर्ज करावा.