नमस्कार मित्रांनो, MSSC महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, कंत्राटी पध्दतीवर तसेच खालील शैक्षणिक पात्रता, पाहणार आहोत.
1. शैक्षणिक पात्रता – उच्च माध्यमिक शालान्त परिक्षा HSC [12 वी पास.
2. भरती परिक्षा व [ 100 ] गुण – 12 वी च्या गुणांचे भार प्राधान्यानुसार 50 गुण व गुण शारिरीक चाचणी करीता 50 गुण असतील.
3. अधिवास निकष – महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे.
4. १२ वी च्या गुणांचे भार प्राधान्य
[first attempt] [Weightage] –
12वी परिक्षेत 70% पेक्षा अधिक गुण – 50 गुण
12वी परिक्षेत 60% ते 70% गुण – 40 गुण
12वी परिक्षेत 50% ते 60% गुण – 30 गुण
12वी परिक्षेत 40% ते 50% गुण – 10 गुण
12वी परिक्षेत 40% पेक्षा कमी गुण – 00 गुण
५. शारिरीक चाचणी –
1600 मीटर धावणे. [50 गुण]
5 मि. 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 50 गुण
5 मि. 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मि. 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 40 गुण
5 मि. 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मि. 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 20 गुण
5 मि. 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मि. 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 10 गुण – 6 मि. 10 सेकंदापेक्षा जास्त 00 गुण [अपात्र]
6. वयोमर्यादा – 18 ते 28 वर्ष [31/01/1992 ते 31/01/2002 दरम्यान जन्मलेले उमेदवारच पात्र]
7. उंची, वजन / छाती –
1. उंची 170 से.मी. पेक्षा कमी नसावी.
2. वजन 60 कि.ग्रॅ. पेक्षा कमी नसावे. –
3. छाती न फुगवता 79 से.मी. वा जास्त. फुगवून किमान 5 से.मी. [Expansion]
7. कंत्राटानुसार मोबदला –
1] मासिक रु.17,000/
2 ] अधिक 12% EPF – Employer Contribution
3] हत्यारी सुरक्षा रक्षकांकरीता रु.1000/- अतिरिक्त हत्यारी भत्ता.